मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर नीलम गोऱ्हे यांनी एका वाक्याची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Neelam Gorhe on Manisha Kayande : मनिषा कायंदे यांचा शिवसेना प्रवेश, अन् प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' कृतीवर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया म्हणाल्या...

मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर नीलम गोऱ्हे यांनी एका वाक्याची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 3:27 PM

पुणे :  मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला.शिवेसना ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या पक्षांतरावर एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. त्यावरही त्या बोलल्या आहेत. तसंच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकवला त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत बऱ्याच वेळा शिवसेनेमध्ये चढ-उतार झालेले आहेत. अनेकांनी नवीन पक्ष काढले. अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. पण शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. राजकीय मतभेद हे अनेक पक्षांमध्ये होतात. काँग्रेसच्या देखील दोन काँग्रेस झाल्या होत्या. आत्ता जे घडलं त्याचं उत्तर भविष्य देईल जनता ठरवेल की कोणी योग्य वळणावर आहे, असं त्या म्हणाल्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. एकनाथ खडसे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. या संदर्भात पक्षाचे जे गटनेते असतात. ते निर्णय घेत असतात, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकवला. त्यावरही नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जायची सवय आहे. ते पूर्वी सुध्दा बऱ्याच वेळेला गेले आहेत, असं त्यांनी म्हटलं.

मी यावर भाष्य करू शकत नाही कारण माझं पद घटनात्मक आहे. पिठाची अधिकारी म्हणून आमची भूमिका न्यायपालिकेसारखी असते. माझ्या काही मर्यादा आहेत. परत परत सांगून सुद्धा राहून नारळीकरांना आणि मला तुम्ही तसेच प्रश्न विचारतात. न्यायिक चौकटीचे हे प्रकरण आहे. मला यावर बोलायची इच्छा नाही, असं म्हणत आमदारांच्या कारवाईवर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी कुणाला शंभर टक्के वेळ देऊ शकत नसतो. म्हणून कदाचित उद्धवजी आमदारांना भेटले नसतील. त्यांची राजकीय मतभेद काय आहेत हे महत्त्वाचं आहे. व्यक्तिगत टीकेपेक्षा राजकीय मतभेद मांडा. बऱ्याच वेळेला हे लोक सोयीनुसार वैयक्तिक टीका करत असतात, असं म्हणत गोऱ्हे यांनी रामदास कदम यांना उत्तर दिलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.