AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress President | मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष, शशी थरूर यांचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

तब्बल 24 वर्षानंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त नेता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होतोय.

Congress President | मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष, शशी थरूर यांचा 'इतक्या' मतांनी पराभव
Image Credit source: social media
| Updated on: Oct 19, 2022 | 9:45 PM
Share

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष (Congress President) पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.9,3,85 सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी 416 मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना 7897 एवढी मतं मिळाली तर शशी थरूर (Shashi Tharoor) यांना 1072 मतं मिळाली.

तब्बल  24  वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हा नेतृत्वबदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस आता नवी रणनीती आखेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे अनुभवी नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात अध्यक्षपदासाठीची चुरस होती.

शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खरगे यांचं अभिनंदन केलं. काँग्रेसचं अध्यक्षपद मिळणं ही गौरवाची आणि जबाबदारीची बाब आहे, असं त्यांनी लिहिलंय. मल्लिकार्जून खरगे यांना या कामात पूर्ण यश मिळो. तसेच या निवडणुकीत 1 हजार पेक्षा जास्त नेत्यांचा पाठिंबा मिळणं हीच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्टी आहे… असं शशी थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.

कर्नाटकमधील काँग्रेसचं प्रबळ नेतृत्व म्हणून मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे पाहिलं जातं. दलित कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांचा तगडा जनसंपर्क आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील विरोधक पक्षांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

पाहा काँग्रेस मुख्यालयातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल-

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.