शरद पवार-अमित शाहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही: जितेंद्र आव्हाड

या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. | Sharad Pawar Jitendra Awhad

शरद पवार-अमित शाहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही: जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 4:36 PM

ठाणे: शरद पवार आणि अमित शाह यांची 26 मार्चला अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याच्या कथित वृत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्यात भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात रान उठवले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरुन भाजपचे नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची भाषाही करत आहेत. नेमक्या त्याचवेळी शरद पवार आणि अमित शाह (Amit Shah) यांची झालेली ही भेट अनेकांसाठी चक्रावून टाकणारी आहे. (NCP leader Jitendra Awhad reaction on Sharad Pawar and Amit Shah meet in Ahmedabad)

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या खास मर्जीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत. मग त्यातील कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, ओदिशातील विजू पटनाईक असो बंगाल मधले जोत्या बसू असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत. आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे यांच्याशीही शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Amit Shah answers alleged meet with NCP Supreme Sharad Pawar at Ahmedabad)

राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

संबंधित बातम्या :

अमित शाहांना जे सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं; पवार-शाह भेटीच्या वृत्तानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्याची सूचक प्रतिक्रिया

VIDEO | सब चीजे सार्वजनिक नहीं होती, पवारांशी गुप्त भेटीच्या चर्चांवर अमित शाहांचं सूचक वक्तव्य

भाजप-राष्ट्रवादीत गुप्त चर्चा; अहमदाबादमध्ये शरद पवार-अमित शाह-प्रफुल पटेल यांची भेट?

(NCP leader Jitendra Awhad reaction on Sharad Pawar and Amit Shah meet in Ahmedabad)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.