एकनाथ शिंदेंच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंची कोंडी; कुठे होणार शिवसेनेचा दसरा मेळावा?

शिंदे गटाच्या खेळीमुळे शिवतीर्थाची परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरेंची कोंडी होणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंची कोंडी; कुठे होणार शिवसेनेचा दसरा मेळावा?
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 8:59 PM

मुंबई :  दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात घमासान सुरु आहे. त्यातच शिंदे गटाने आधीच BKC मैदानाची परवानगी मिळवली आहे. यामुळे शिवतीर्थावर परवानगी मिळाली नाही तर शिंदे गट BKC मैदानावर दसरा मेळावा घेणार आहे. शिंदे गटाच्या खेळीमुळे शिवतीर्थाची परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरेंची कोंडी होणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

मात्र, मुंबई महापालिकेने या मैदानावर मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान मिळावे, यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे शिंदे गटाला दसरा मेळावा दुसरीकडे घ्यावयचा झाल्यास बीकेसे मैदान हे पर्यायी जागा त्यांना उपलब्ध झाली आहे.

तर, दुसरीकडे शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आदेशच उद्धव ठाकरेंनी सर्व जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शिवसेनेकडून मिळाले आहेत.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वातावरण निर्मिती देखील केली जात आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच अशा आशयाची पोस्टर शिवसेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत दसरा मेळाव्याबाबत ठाम भूमिका मांडताना दिसत आहेत. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत.

दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत शिवसेनेने परवानगीसाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केली केली आहे. मात्र, अद्याप BMC ने कुणालाच परवानगी दिलेली नाही. शिंदे गटाने बीकेसी मैदानासाठी परवानगी मिळविल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत आला आहे.

शिंदे गटाने पहिल्यांदा अर्ज दाखल केला म्हणून त्यांना BKC मैदानाची पहिल्यांदा परवानगी मिळाली. हा निकष महापालिकेने लावला आहे. हाच निकष लावायचा असेल तर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिवतीर्थावर आम्हालाच परवानगी दिली पाहिजे असेही सावंत म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.