आमदार निलेश लंकेंचा मोठा निर्णय, सत्काराऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन
हार, बुके ऐवजी वही, पेन स्वरुपात सत्कार करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं आहे. Nilesh Lanke
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी हार, बुके स्वरुपात सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. पारनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हार, बुके ऐवजी वही, पेन स्वरुपात सत्कार करावा, असं आवाहन निलेश लंके यांनी केलं आहे. निलेश लंके यापूर्वी कार्यकर्त्याला गादीवर झोपायला सांगून स्वत: जमीनीवर झोपल्यामुळं चर्चेत आले होते. (Nilesh Lanke appeal to people gave note book, pen for welcome)
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी यापुढे हार, बुके स्वरुपातील कोणताही सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या कार्यकर्त्यांना सत्कार करायचा असेल त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी, असं आवाहन लंके यांनी केले आहे.निलेश लंके यांनी मतदारसंघातील ज्यांना सत्कार करायचा असेल त्यांनी वही, पेन, कंपास, शाळेसाठी कपडे अश्या वस्तू देऊन माझा सत्कार करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाची सुरुवात झाली असून एका कार्यकर्त्याने लहान मुलांसाठी 50 चपलाचे जोड, कपडे, वह्या, देऊन केल्याची माहिती निलेश लंकेंनी दिली. (Nilesh Lanke appeal to people gave note book, pen for welcome)
हार, बुके स्वरुपात सत्कार न स्वीकारण्याच्या निर्ण्याचा याचा फायदा गोरगरीब जनतेला होणार आहे. ज्याला परिस्थितीची जाणीव आहे, तोच हा विचार करू शकतो, असं मत लंके यांनी व्यक्त केलेय. विशेष म्हणजे शिक्षण घेतांना मला देखील कंपास नव्हती तर शाळेत जाण्यासाठी पासला पैसे नव्हता. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे आमदार लंके म्हणाले. आमदार निलेश लंके यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फायदा मतदार संघातील गरजू विद्यार्थ्यांना होणार असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. (Nilesh Lanke appeal to people gave note book, pen for welcome)
मार्च महिन्यात निलेश लंके चर्चेत
मार्च महिन्यात मुंबईतील आमदार निवासात, कार्यकर्ते गादीवर आणि आमदार निलेश लंके सतरंजीवर झोपल्याचं पाहायला मिळालं. निलेश लंके यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते मुंबईतील आले होते. आमदार निलेश लंके हे आमदार निवासात आले त्यावेळी कार्यकर्ते आधीच त्यांच्या बेडवर झोपेले होते. ते पाहून निलेश लंके यांनी बाजूची सतरंजी जमिनीवर टाकली आणि खालीच झोपणे पसंत केलं होतं.
निलेश लंके जमिनीवर झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक वेळा आमदारांचा बडेजाव पाहायला मिळतो, मात्र लंके यांचे साधे राहणीमान पाहून त्यांचे कौतुक झाले होते.
कोण आहेत आमदार निलेश लंके?
- निलेश लंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
- ते नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
- निलेश लंके हे आधी शिवसेनेत होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लंके यांनी शिवसेना आमदार विजय औटी यांचा पराभव केला.
Video | Beed | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंकडून मतदान, सतीश चव्हाण विजयी होण्याचा विश्वास@dhananjay_munde pic.twitter.com/wmy6vTRsrX
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या:
आमदारांच्या बेडवर कार्यकर्ते, दिलदार निलेश लंकेंची माणुसकी, झोपेतून न उठवता स्वत: सतरंजीवर झोपले!
(Nilesh Lanke appeal to people gave note book, pen for welcome)