AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खऱ्या आईचं दूध पिला असाल तर दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ : निलेश राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानं राज्यभरात शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला त्यांची औकात दाखवून देऊ असं म्हणत या वादाला फोडणी दिलीय.

खऱ्या आईचं दूध पिला असाल तर दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ : निलेश राणे
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 10:03 AM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानं राज्यभरात शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला त्यांची औकात दाखवून देऊ असं म्हणत या वादाला फोडणी दिलीय. निलेश राणे यांनी एक ट्विट करत शिवसेनेच्या बॅनरबाजीला आणि हात छाटण्याच्या धमक्यांनी फरक पडत नाही असंही म्हटलंय. एकूणच नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चढलाय.

निलेश राणे म्हणाले, “कुठेतरी बॅनर लावा आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो, तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.”

आम्ही तुमची वाट बघतोय, नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तसे ट्विट केले आहे.

माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

हेही वाचा :

शिवसेनेनं दाखवला नारायण राणेंना इंगा, अटकेचे आदेश, मुंबईत बॅनरबाजी

नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, भाजपने ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं

शिवसेनेने वात पेटवली, नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल होण्याची मालिका, चिपळूणमध्ये रंगणार हायव्होल्टेज ड्रामा?

व्हिडीओ पाहा :

Nilesh Rane challenge Shivsena for fight in front on controversial statement of Narayan Rane

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.