Uddhav Thackeray : तुझं तेही माझं, माझं तेही माझं, ह्याचं तेही माझं, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मिम्सचा पाऊस
त्यावर कॅप्शन लिहिलं आहे की, "अशी मुलाखत संजय राऊतच घेऊ शकतो" असा आशय लिहिला आहे.
मुंबई – सकाळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला. त्यानंतर त्या मुलाखतीवर अनेकांनी टीका केली आहे. तसेच ठरवून घेतलेली मुलाखत असा टोला भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. मुलाखत प्रसारीत झाल्यानंतर निलेश राणे (Nilesh rane) यांनी एक सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केली आहे. तो व्हिडीओ आज सकाळी प्रकाशित झालेल्या मुलाखतीचा आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे एका प्रश्नाचे उत्तर देताना नेमकं काय म्हणायचं हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे निलेश राणे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन लिहिलं आहे की, “अशी मुलाखत संजय राऊतच घेऊ शकतो” असा आशय लिहिला आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या ट्विटची अधिक चर्चा आहे. निलेश राणे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरती कायम टीका करतात.
नेमकं व्हिडीओमध्ये काय आहे
तुझ ते माझं, माझं ते तुझं..ते माझं ते माझं…ह्याचे ते माझं..त्याचं तेही माझं..माझं ते माझं..तूझं ते तूझ…इथं पर्यंत होत. आता याचं ही माझं..आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्याची हाव गेली आहे. त्यानंतर अरे बाई आप केहना क्या चाहते हो असा डायलॉग आहे. हा व्हिडाओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून राजकीय चर्चा अधिक सुरु झाली आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना नेमकं काय बोलत आहेत किंवा ते संभ्रम निर्माण करणार आहे.
उद्धव ठाकरे यांची मुलाखत कौटुंबिक असल्याची टीका
उद्धव ठाकरे यांची मुलाखत कौटुंबिक असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी मुलाखतीत वापरलेले शब्द राज्याच्या संस्कृतीला न पटणार आहेत. शिवसेना आमदारांनी व्यक्त केलेला बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरे यांनी तुडविल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी राणे-कंगना-नवनीत राणा यांच्यावर सूड उगवला ते आता सूडाची भाषा करत आहेत असे मत देखील त्यांनी आज व्यक्त केलं. आज खंजीर खुपसला अशी भाषा करणाऱ्यांना भविष्यात तेच बोधचिन्ह मिळो अशी खोचक टीका केली आहे.