“पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत”
शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऑक्सिजन तुटवडा (Oxygen shortage) भरुन काढण्यासाठी साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऑक्सिजन तुटवडा (Oxygen shortage) भरुन काढण्यासाठी साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh rane) यांनी पवारांच्या या आवाहनावर निशाणा साधला आहे. “साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील”, असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीला कोट करुन, हे ट्विट केलं आहे. (Nilesh Rane criticize NCP chief Sharad Pawar after his letter to sugar mills for Oxygen Production )
निलेश राणे यांचं ट्विट
साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील. https://t.co/6cnJEt7kUm
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 23, 2021
शरद पवार नेमकं काय म्हणाले
ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
राज्यातील 190 कारखान्यांना पत्र
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलेय. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत.
VIDEO : शरद पवारांचं पत्र
संबंधित बातम्या
शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना निर्मिती करण्याचे आदेश
Breaking | साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, शरद पवारांचं सर्व कारखान्यांना पत्र