आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले
सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
मुंबई : मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रनौतला माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी धारेवर धरले आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे निलेश राणे यांनी कंगनाला बजावले. (Nilesh Rane warns to Kangana Ranaut not to insult Maharashtra Police)
“दोन-तीन अधिकारी प्रेशरमध्ये आले, म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत (कंगना रनौत) कोण लागून गेली? अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही” असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 3, 2020
रणवीर सिंह, रणबीर कपूर, विकी कौशल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना ड्रग्ज टेस्ट देऊन निर्दोषत्व सिद्ध करण्याचे चॅलेंज कंगनाने कालच दिले होते. त्यानंतर निलेश यांनी “फक्त रणवीर-रणबीरच का? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ड्रग्ज टेस्ट करावी. कारण तेही बॉलिवूडच्या आतल्या गोटातील कलाकारांच्या जवळचे आहेत” अशी मागणी केली होती.
Why just Ranveer and Ranbir I feel even Aditya Thakre should undergo random drug test. After all he has also been very cozy with Bollywood’s inner circle.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.
Liking derogatory tweets about people who are fighting against the murderers of Sushant, instead of condemning public teasing and bullying like this @CPMumbaiPolice is encouraging it, @MumbaiPolice has hit all time low … SHAME !! pic.twitter.com/9H4mhC9Nsk
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 1, 2020
(Nilesh Rane warns to Kangana Ranaut not to insult Maharashtra Police)
“जेव्हा गुंडगिरी आणि माझ्याविरुद्ध गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे मुंबई पोलिस आयुक्त अशाप्रकारे मला उघडपणे धमकावतात, तेव्हा मी मुंबईत सुरक्षित असेन का? माझ्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार आहे?” असा प्रश्नही कंगनाने विचारला होता.
You are a big sham in the name of police force, don’t you forget not just me all the people tagged got notifications of @CPMumbaiPolice liking the derogatory tweet, trying to prove victim a criminal seems your old dhandha, don’t you dare to lie @MumbaiPolice, don’t you dare .. https://t.co/6v5bwEE7An
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 2, 2020
“मी नार्कोटिक्स ब्युरोला मदत करण्यास उत्सुक आहे पण मला केंद्र सरकारकडून संरक्षण हवे आहे. मी फक्त माझे करिअरच नव्हे तर माझा जीवही धोक्यात घातला आहे, हे स्पष्ट आहे की सुशांतला काही गलिच्छ रहस्ये माहित होती, म्हणूनच तो मारला गेला.” असे ट्वीट कंगनाने आठ दिवसांपूर्वी केले होते.
“अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्जशी संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असल्याचे स्वतः सांगत आहे. याचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारने चार दिवसानंतरही कंगनाला सुरक्षा का दिली नाही? रियाचे वकील किंवा दलाल असल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार कुणाला लपवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?” असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी त्यानंतर विचारला होता.
विशेष म्हणजे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचा समाचार घेतला होता.
हेही वाचा :
रणवीर, रणबीर, विकी आणि अयानने ड्रग्ज टेस्टमध्ये निर्दोषत्व सिद्ध करावे, कंगनाचे चॅलेंज
‘आरोप सिद्ध होण्याआधीच दोषी ठरवू नका’, अभिनेत्री विद्या बालन रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ
प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सिद्धार्थ पिठानीचा सीबीआय चौकशीत दावा
मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना
कंगना ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार, सरकारकडून सुरक्षा का नाही? : राम कदम
(Nilesh Rane warns to Kangana Ranaut not to insult Maharashtra Police)