AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग मी त्यात बोट घातलं होतं का? नितेश राणेंनी स्वत:च्या आरोग्याची कुंडलीच मांडली, आजार राजकीय?

नितेश राणे यांचा आजार राजकीय असल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला नितेश राणे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांना प्रत्यु्त्तर देताना नितेश राणे यांनी आपल्या आरोग्याची (health) कुंडलीच मांडली आहे.

मग मी त्यात बोट घातलं होतं का? नितेश राणेंनी स्वत:च्या आरोग्याची कुंडलीच मांडली, आजार राजकीय?
नितेश राणे
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 4:19 PM

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणात (Attack on Santosh Parab) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामीन मंजूर झालेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. यावरून विरोधकांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे यांचा आजार राजकीय असल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला नितेश राणे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांना प्रत्यु्त्तर देताना नितेश राणे यांनी आपल्या आरोग्याची (health) कुंडलीच मांडली आहे. मी जरी कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मला आजही त्रास होतोय. त्यामुळे मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. मला पाठिच्या मनक्याचा त्रास होत आहे. माझी शुगर लो आहे. मात्र तरीही काही जण म्हणतात की माझा आजार हा राजकीय होता, मग डॉक्टरांनी केलेल्या टेस्ट खोट्या होत्या का असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी तेव्हा गळ्यात बेल्ट का घातला?

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, डॉक्टरांनी माझा आताच बीपी चेक केला. माझा बीपी 152 पर्यंत लो झाला आहे. मग डॉक्टरांनी आतापर्यंत माझ्या ज्या काही टेस्ट केल्या त्या खोट्या आहेत का? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. प्रश्न आम्ही देखील विचारू शकतो.  जेव्हा सरकार पाडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच त्यांना कोरोना कसा होतो? असे म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे.

राजकारणाचा स्थर खालावला आहे

विरोधक माझ्यावर टीका करताना म्हणाले की माझा आजार राजकीय होता. जामीन मिळाल्यानंतर लगेच बरे वाटले. कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं किती योग्य आहे, हे तपासण्याची वेळ आलीये.  राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. सध्या मला बीपीचा त्रास आहे. तसेच पाठीच्या मनक्याचा देखील त्रास आहे. त्यामुळे मी आता काही काळ आराम करणार आहे. त्यानंतर पुन्हा कामाला लागेल. दीड महिन्यापासून मी मतदारसंघात गेलो नाही. माझ्यावर गोव्याची देखील जबाबदारी आहे, त्यामुळे तिथेही जावे लागणार आहे. मी तब्येत सांभाळून काम करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Nitesh Rane Video: आधी तुरुंगाची हवा, नंतर आजारपण; जामीन मिळाल्यानंतर बाहेर येताच काय म्हणाले नितेश राणे?

मग मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का घालतात? दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या सवालाच्या फैरी

Vijay Vadettiwar | उत्तरप्रदेशात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट, पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा पलटवार

पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.