“A फॉर आफताब A फॉर आदित्य, सगळ्या विकृतींचं नाव एकच!”, नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप...

A फॉर आफताब A फॉर आदित्य, सगळ्या विकृतींचं नाव एकच!, नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 11:03 AM

मुंबई : भाजपचे नेते नितेश राणे यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput death Case)आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. “A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच!”, असं म्हणत नितेश राणे (Nitesh rane) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.

सुशांत सिंह राजपूत केसचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का समोर येतं? दाल में जरूर कुछ काला है! आदित्य ठाकरे यांचा या केसशी संबंध आहे. त्यामुळे याची व्यवस्थित चौकशी व्हायला हवी, असं नितेश राणे म्हणालेत.

राहुल शेवाळे आधी शिवसेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. तेव्हा त्यांच्या बोलण्याला किंमत होती.मग आता त्यांच्या बोलण्याचा तुम्ही सिरियसली घेत नाही, याला काहीही अर्थ नाही. राहुल शेवाळे यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. आधी जे त्यांनी मुद्दे मांडले आहेत तेच मुद्दे आम्ही मागच्या काही दिवसांपासून आम्ही बोलत आहोत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच पाहिजे, असं नितेश राणे म्हणालेत.

राहुल शेवाळे यांचे आरोप

सुशांतसिंह राजपूत केसबाबतही राहुल शेवाळे यांनी भाष्य केलंय. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला, सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले होते ते AU यावरून आले होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय, म्हणून हा प्रश्न मी उपस्थित केला, असं शेवाळे म्हणाले. त्यांच्या या आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.