Sanjay Raut ED : जगातील सगळ्यात मोठा माणूस असल्याचा आव आणतात, ईडी चौकशीत कशी त्रेधातिरपीट उडते ते कळेल- नितेश राणे
Sanjay Raut ED : नितेश राणेंचं टीकास्त्र
मुंबई : आमच्या सगळ्यांची सकाळ खराब करणारे आज त्यांची सकाळ खराब होत असताना समाधान वाटते. ईडी एनआयए यासारख्या संस्था योग्य दिशेने चौकशी करतात. आज ते राऊतांच्या घरी आहेत. सतत मी जगातील सगळ्यात मोठा माणूस असल्याचा आव आणतात, ईडी चौकशीत कशी त्रेधातिरपीट उडते ते कळेलच, असं भाजप नेते नितेश राणे म्हणाले आहेत. आता राऊतांच्या घरात कॅरेमा लावायला हवा, ईडी चौकशीदरम्यान त्यांची काय अवस्था होते ते कळेल, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. याबाबत त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली.
राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.
संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता
20 जुलै रोजी, ईडीने संजय राऊत यांना मुंबईच्या उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. संसदेच्या अधिवेशनाचं कारण देत त्यांनी पुढची तारिख मागितली होती. त्यानंतर राऊत यांच्या वकिलाने बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात जाऊन 7 ऑगस्टपर्यंत सूट मागितली होती. मात्र, त्यांचा अपील त्यावेळी फेटाळण्यात आला. त्यानंतर आता ईडीने नवीन समन्स जारी करून राऊत यांना 27 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. आज संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कितीवेळ चौकशी होणार हे कोणी सांगू शकत नाही. कारण यांच्या आगोदर ज्या राजकीय नेत्यांवर चौकशी झाली आहे ती अधिककाळ चालली आहे.