AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी…. : नितीन गडकरी

केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी नागपुरात अखिल माळी समाज महाधिवेशनाच्या (Mali community) कार्यक्रमात बोलत होते.

बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी.... : नितीन गडकरी
| Updated on: Sep 16, 2019 | 2:47 PM
Share

नागपूर :  “बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो., मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं, मला नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हायचं आहे”, असं केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नमूद केलं. ते नागपुरात अखिल माळी समाज महाधिवेशनाच्या (Mali community) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची उपस्थिती होती.

यावेळी गडकरी म्हणाले, “मी सगळ्याच समाजाच्या कार्यक्रमात जातो, प्रत्येक समाजात मागणी असते आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे, मंत्रिपद समाजाला मिळालं पाहिजे. पण मी थोडा स्पष्ट बोलतो आणि सांगतो की विशिष्ट समाजातला माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून त्याच  समाजाचा विकास होईल असं नाही त्याला सगळ्याच समाजाचा विचार करावा लागतो.”

माळी समाजातील अनेक लोक चांगले शिक्षित आहेत. शिक्षणाचा उपयोग समाज विकासासाठी व्हावा. आता सगळ्याच समाजाने रुढी परंपरेच्या बाहेर येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली.

प्रत्येक समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. अनेक समाजात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पण त्यांचा विकास झाला नाही. तो करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न केल्यास कुठलंच कार्य अशक्य नाही त्यासाठी समाजातील जागरुकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं गडकरींनी नमूद केलं.

मी 15 हजार ग्रामीण भागातील युवकांना रोजगार दिला, त्यात माझ्या समाजाचे 50 सुद्धा नाहीत. मी जाती- धर्म मानत नाही. प्रत्येकासाठी काम करतो, असंही नितीन गडकरींनी सांगितलं.

जे लोक कर्तृत्वाने हरतात ते तिकीट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात. आरक्षण मिळाल्याने सगळा विकास होतो असं नाही. कर्तृत्व सुद्धा विकास घडवते. म्हणून आपण करतो त्या कामाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे, असं गडकरींनी ठणकावून सांगितलं.

आम्ही असे नेते तयार केले पाहिजे जे देशाला विकासाच्या कक्षेत आणेल, राज्याच्या विकासासाठी काम करेल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची माळी समाजाची मागणी आहे त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार, असं गडकरींना आश्वासन दिलं.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.