AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महामार्गांच्या कामाला शिवसेनेचा विरोध नाही’, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाशिमच्या सेना लोकप्रतिनिधीचा दावा

महामार्गाचं काम थांबवण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जाते याची एक कथित ऑडिओ क्लिप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. ही ऑडिओ क्लिप शिवसेनेचे रिसोड तालुकाध्यक्ष महादेव ठाकरे यांची असल्याचं कळतंय. त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी ज्या रस्त्याचं काम केलं त्याला शिवसेनेचा विरोध नसल्याचं महादेव ठाकरे यांनी म्हटलंय.

'महामार्गांच्या कामाला शिवसेनेचा विरोध नाही', ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाशिमच्या सेना लोकप्रतिनिधीचा दावा
महादेव ठाकरे, वाशिम, शिवसेना लोकप्रतिनिधी
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 6:11 PM
Share

वाशिम : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून महामार्गाच्या कामाला अडथळा निर्माण केला जात असल्याचं पत्र लिहिलं. त्यानंतर या मुद्द्यावरुन आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून नितीन गडकरींना प्रतिप्रश्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महामार्गाचं काम थांबवण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जाते याची एक कथित ऑडिओ क्लिप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. ही ऑडिओ क्लिप शिवसेनेचे रिसोड तालुकाध्यक्ष महादेव ठाकरे यांची असल्याचं कळतंय. त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी ज्या रस्त्याचं काम केलं त्याला शिवसेनेचा विरोध नसल्याचं महादेव ठाकरे यांनी म्हटलंय. (Explanation of Washim’s local ShivSena leader after Nitin Gadkari’s letter)

नितीन गडकरी यांनी ज्या रस्त्याचं काम केलं त्याला शिवसेनेचा विरोध नाही. विरोध असता तर आम्ही जिल्ह्यातील 90 टक्के काम होऊ दिलं असतं का? असंही महादेव ठाकरे यांनी म्हटलंय. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, ज्या ठिकाणी अपघात झाले आहेत, अशा ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. मात्र, शिवसेनेनं कुठेही रस्त्याचं काम अडवलेलं नाही. आमच्यावर केले जात असलेले आरोप खोटे असल्याचा दावाही महादेव ठाकरे यांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे.

जिल्हा नियोजन समिती सदस्य असल्याचं सांगून फोन करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचं काम थांबवा असं सांगणारा फोन माधवरावन ठाकरे यांनी केल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येतं. पत्रात उल्लेख असलेल्या सेलू बाजार जिल्हा वाशिम येथे महामार्गाचं काम थांबल्याचा व्हिडीओही टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही.

नाना पटोलेंचा गडकरींना टोला

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण 25 वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हतं का? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे? असा सवाल नाना पटोले यांनी केलाय. त्याचबरोबर महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

अरविंद सावंत काय म्हणाले?

“माननीय नितीन गडकरी यांचा पूर्ण आदर आहे, पण त्यांनी शिवसेना शब्द वापरण्याऐवजी त्या एका विशिष्ट भागाचा उल्लेख केला असता, तर बरं झालं असतं. पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केला. जणू काही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे, असा सूर त्या पत्रातून व्यक्त होतोय, ते गैर आहे असं मला वाटते.” असं अरविंद सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या :

कामं थांबवा, नितीन गडकरींच्या स्फोटक पत्रानंतर आता शिवसैनिकाची कथित Audio क्लिप समोर

…तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामांचा विचार करावा लागेल, गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, वाचा जसंच्या तसं

Explanation of Washim’s local ShivSena leader after Nitin Gadkari’s letter

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.