VIDEO : आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री सगळेच टेन्शनमध्ये, नितीन गडकरींच्या कोपरखळ्या
जो मुख्यमंत्री बनतो, तो आपल्याला पदावरुन कधी हटवलं जाईल याचा अंदाज नसल्यामुळे टेन्शनमध्ये असतो, असं नितीन गडकरी म्हणाले. ते राजस्थानातील जयपूरमध्ये आयोजित संसद प्रणाली आणि जन अपेक्षा या कार्यशाळेत बोलत होते.
जयपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. राजस्थानातील जयपूरमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदावरुन बेधडक विधान केलं. जो मुख्यमंत्री बनतो, तो आपल्याला पदावरुन कधी हटवलं जाईल याचा अंदाज नसल्यामुळे टेन्शनमध्ये असतो, असं नितीन गडकरी म्हणाले. ते राजस्थानातील जयपूरमध्ये आयोजित संसद प्रणाली आणि जन अपेक्षा या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (congress Ghulam Nabi Azad) उपस्थित होते.
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा आहे. कारण नुकतंच गुजरातमध्ये (Gujarat) विजय रुपाणी (Vijay Rupani) यांना हटवून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली आहे.
नितीन गडकरी म्हणाले, “आजकाल प्रत्येकाला समस्या आहेत, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार दु:खी आहे कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं नाही मिळालं, ज्यांना चांगलं खातं मिळालं ते दु:खी आहेत कारण त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. तर मुख्यमंत्री यासाठी दु:खी आहेत कारण आपण पदावर कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा भरवसा नाही”
लोकशाहीचं ध्येय, शेवटच्या व्यक्तीचा विकास
राजस्थान विधानसभेद्वारे आयोजित कार्यक्रमात गडकरींनी सध्याचं राजकारण आणि लोकशाहीच्या मूल्यांवर भाष्य केलं. “राजकारणाचा मुख्य उद्धेश हा सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणं हा आहे. मात्र सध्याचं राजकारण केवळ सत्ता मिळवण्यासाठी सुरु असल्याचं दिसतं. लोकशाहीचं अंतिम ध्येय शेवटच्या व्यक्तीचा विकास आहे”, असं गडकरींनी सांगितलं.
भाजपकडून मुख्यमंत्री बदलाचा सपाटा
दरम्यान, भाजपने अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावल्याचं चित्र आहे. नुकतंच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री बदलले. त्याआधी उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याजागी तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. पण काहीच तासात त्यांनाही बदलून पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी कर्नाटकात येडियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आलं. तर तिकडे आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी हिमंत बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं.
VIDEO : नितीन गडकरींच्या कोपरखळ्या
संबंधित बातम्या
Nitin Gadkari | टार्गेट पूर्ण केलं तर फुलांची माळ देईन नाहीतर स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल : गडकरी
VIDEO: काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, म्हणूनच पवारांचा टेकू; रावसाहेब दानवेंची
Gadkari vs Patole : नितीन गडकरी-नाना पटोले यांची ‘कोर्ट लढाई’, दोन बड्या नेत्यांमध्ये ‘सामना’