‘भाजपचा अभिमान तोडायचा आहे’, नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारात नितीन राऊतांचा हल्लाबोल

प्रचाराचा सुपरसंडे असल्यानं आज अभिजित वंजारी यांच्या प्रचारासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी राऊत आणि ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा अभिमान आपल्याला तोडायचा असल्याचं सांगत राऊत यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

'भाजपचा अभिमान तोडायचा आहे', नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारात नितीन राऊतांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 1:22 PM

नागपूर: भाजपचा गड असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत यंदा भाजपचे संदीप जोशी विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी अशी तगडी फाईट आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. पण यंदा काँग्रेसनंही विजयासाठी कंबर कसली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत भाजप उमेदवार जिंकत आला आहे. मात्र, यावेळी भाजपचा अभिमान तोडायचा आहे, असं म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वंजारी यांना मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. (Nitin Raut criticizes BJP in Nagpur graduate constituency election campaign)

प्रचाराचा सुपरसंडे असल्यानं आज अभिजित वंजारी यांच्या प्रचारासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी राऊत आणि ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा अभिमान आपल्याला तोडायचा असल्याचं सांगत राऊत यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर पदवीधरवर यंदा कुणाचा झेंडा?

नागपूर पदवीधर मतदारसंघावर (Nagpur Graduate Constituency Election) आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवत संदीप जोशी (Sandeep Joshi) यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी (Abhijeet Vanjari) यांच्यासाठीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जोर लावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमुळे 28 टक्के मतदार घटले, याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रचाराचा सुपरसंडे, दिग्गज नेते मैदानात

विधानपरिषदेच्या पदवीधर 3 आणि शिक्षक मतदारसंघासाठीचा 2 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज दिग्गज नेते मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यासह अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा सुपरसंडे, दिग्गज नेते मैदानात

मनसेचा हुकमी एक्का मैदानात उतरणार; राज ठाकरे पदवीधर निवडणुकीसाठी प्रचार करणार?

Nitin Raut criticizes BJP in Nagpur graduate constituency election campaign

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.