VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, नितीन राऊत यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. (Nitin Raut Cricket Nagpur)

VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, नितीन राऊत यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 9:56 AM

नागपूर : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना फलंदाजी करताना पाहण्याचा योग समर्थकांना आला. नागपुरात आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनसाठी राऊत उपस्थित होते. यावेळी हातात बॅट धरत नितीन राऊत यांनी फलंदाजीचा आनंद लुटला. (Nitin Raut plays Cricket Match in Nagpur)

नितीन राऊतांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

सुदर्शन प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप टूर्नामेंट 2021 चे नागपुरात आयोजन करण्यात आले होते. नागपूर मेहतर विविध उद्देशीय सहकारी संस्था (मर्या.) नागपूरतर्फे बेझनबाग मैदानात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

नितीन राऊत यांनी प्रमुख उपस्थिती लावत स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला. नितीन राऊत यांनी नाणेफेक केली. त्यानंतर स्वतः हातात बॅट घेऊन राऊत खेळपट्टीवर उभे राहिले आणि त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

कोण आहेत नितीन राऊत

  • 1999, 2004, 2009 मध्ये विधानसभा आमदार
  • ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूर उत्तर मतदारसंघातून पुन्हा विधानसभेवर निवड
  • डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2009 गृह, तुरुंग, राज्य उत्पादन शुल्क व कामगार खात्याचे राज्यमंत्री
  • 2014 पर्यंत आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी आणि जलसंवर्धन मंत्रालय कॅबिनेट मंत्री
  • ठाकरे सरकार कॅबिनेटमध्ये ऊर्जा मंत्रालयाची धुरा
  • महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)च्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष
  • (Nitin Raut plays Cricket Match in Nagpur)

हसन मुश्रीफ यांची फलंदाजी

कागल बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या मैदानावर हसन मुश्रीफ यांची बॅटिंग पाहण्याचा योग समर्थकांना गेल्या महिन्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. समर्थकांचा आग्रह आणि क्रिकेट खेळण्याची हौस, यामुळे मुश्रीफ यांनाही फलंदाजी करण्याचा मोह आवरता आला नाही.

हसन मुश्रीफ बॅटिंगसाठी उतरले, तेव्हा त्यांनी चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. मुश्रीफ बॅटिंग करतानाचा व्हिडीओ चाहत्यांनी लगेच कॅमेरात कैद केला. त्यानंतर अल्पावधीतच तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. आपल्या लाडक्या नेत्याचं न पाहिलेलं रुप पाहून त्यांचे समर्थकही चकित झाले आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO |हसन मुश्रीफ यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

(Nitin Raut plays Cricket Match in Nagpur)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.