Congress | आज ट्रेलर है पिक्चर अभी बाकी हैं!, नितीन राऊतांनी केंद्राला सुनावले, नागपुरात काँग्रेसचे आंदोलन
इंदिरा गांधींना अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशातील कायदा व्यवस्था ढासळून पडली होती. आज ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. जेवढं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढं आम्ही पेटून उठू. राहुल गांधींनी आजी आजोबा, वडिलांच्या शरीराचे तुकडे तुकडे पाहिले ते राहुल गांधी ED ला घाबरणार नाही.
नागपूर : काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ईडीनं नोटीस पाठविली. याचा निषेध करण्यासाठी नागपुरात सेमिनरी हिल्स येथील ईडीच्या कार्यालयासमोर विदर्भातील काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले, काँग्रेस ताकतवार आहे ती हरणार नाही. आम्हाला नोटीस देतात आणि म्हणतात भाजपमध्ये येता का. मात्र जे गेले ते साफ झाले. सत्तेचा वापर विरोधकांना संपविण्यासाठी करायचा नसतो. विकास करायचा नाही. मात्र देव धर्माच्या आणि इतर गोष्टी करून वातावरण खरब केलं जातं आहे. रुपयाची किंमत घसरली. महागाई (inflation) वाढली आहे. याकडून लक्ष वळविण्यासाठी हे सगळं सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याना (activists) घाबरविण्यासाठी राहुल गांधी यांना नोटीस दिली आहे. पाकिस्तान, बांगलादेश श्रीलंकेपेक्षा या देशाची स्थिती खराब झाली आहे. राहुल गांधी यांना शक्ती प्रधान करण्यासाठी हे कार्यकर्ता जमले आहेत. राहुल गांधी यांना नोटीस त्यांनी यासाठी दिली की ते घाबरले आहेत. म्हणून राहुल गांधी यांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. 2024 मध्ये मोदींचं सरकार येणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.
राहुल गांधी ED ला घाबरणार नाही
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, इंदिरा गांधींना अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशातील कायदा व्यवस्था ढासळून पडली होती. आज ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. जेवढं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढं आम्ही पेटून उठू. राहुल गांधींनी आजी आजोबा, वडिलांच्या शरीराचे तुकडे तुकडे पाहिले ते राहुल गांधी ED ला घाबरणार नाही. सोनिया गांधी यांनी सगळ्या खासदारांची इच्छा असताना देखील पंतप्रधान पदाचा त्याग केला.
सुनील केदार यांची आंदोलनात अनुपस्थिती
काँग्रेस अध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी यांना इडीची नोटीस देण्यात आली. त्याचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेसनं नागपूरच्या ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. त्याची जोरदार तयारी काँग्रेसनं केली होती. मोठ्या प्रमाणात बॅनर पोस्टरसुद्धा लावण्यात आले. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात वसंत पुरके, अभिजित वंजारी उपस्थित होते. पण, मंत्री सुनील केदार हे या आंदोलनात आले नाही. विदर्भातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलनाचं आयोजन केलं होतं.