Nasik NMC Election 2022, Ward (30) : प्रभाग क्रमांक 30, भाजप आपला गड कायम राखणार!
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये गोविंदनगर, कर्मयोगी नगर, कालीका पार्क, खांडे मळा, बडदे नगर, लेखा नगर, या प्रमुख भागांचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत या प्रभागातील चारही जागेवर भाजपाचे (BJP) उमेदवार विजयी झाले होते.
नाशिक : राज्याच्या अनेक प्रमुख शहरातील महापालिकेच्या निवडणुका (Elections) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. गेल्या निवडणुकीत नाशिकमध्ये (Nashk) भाजपाने (BJP) बाजी मारली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती.गेल्या निवडणुकीत मनसेच्या पदरात फारसं यश पडलं नाही. त्यांना अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 30 बाबत बोलायचे झाल्यास.प्रभाग क्रमांक 30 मध्ये गोविंद नगर व जुना सिडको परिसर यांचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत या प्रभागामधून चारही जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 30 अ मधून श्याम बडोदे हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 30 ब मधून सुप्रिया खोडे या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 30 क मधून दिपाली कुलकर्णी, तर ड मधून सतिश सोनवणे हे विजीय झाले होते.
प्रभाग क्रमांक 30 मधील महत्त्वाचे भाग
प्रभाग क्रमांक 30 मध्ये गोविंदनगर, कर्मयोगी नगर, कालीका पार्क, खांडे मळा, बडदे नगर, लेखा नगर, लक्ष्मी नगर, भुजबळ फॉर्म, बालभारती मागील स्लम परीसर, अचानक चौक, लाईफ केअर हॉस्पिटल, अनमोल नयनतारा या प्रमुख भागांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 30 मध्ये लोकसंख्या किती?
प्रभाग क्रमांक 30 ची एकूण लोकसंख्या 36778 इतकी असून, त्यापैकी 3293 एवढी अनुसूचित जातीची तर 1124 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मधील चित्र काय?
2017 मध्ये या प्रभागात चार पैकी चारही जागांवर भाजपाने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक 30 अ मधून श्याम बडोदे हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 30 ब मधून सुप्रिया खोडे या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 30 क मधून दिपाली कुलकर्णी, तर प्रभाग क्रमांक 30 ड मधून सतिश सोनवणे यांनी बाजी मारली होती.
यंदा प्रभागातील आरक्षण कसे?
महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 30 अ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 30 ब मध्ये सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक क हा सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आरक्षीत आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 29 अ
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 29 ब
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 29 क
पक्ष | उमेदवार | विजीय/आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
2017 मधील पक्षीय बलाबल काय?
2017 मध्ये नाशिक महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. तब्बल 65 जागेंवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना होती. 33 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या होत्या तर मनसेचे उमेदवार पाच जागांवर निवडून आले होते.