कोणतंही सरकार कायम नसतं, नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना

कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली. आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत.

कोणतंही सरकार कायम नसतं, नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना
Amit Thackeray
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 12:29 PM

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे देखील या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजल्यापासून शहराच्या तीनही विभागांमध्ये बैठकांचा आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकांमध्ये पदाधिकार्‍यांशी चर्चा आणि शाखा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मनसे कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची लगबग आहे. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली.

आम्ही तयारीला लागलोय

एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. अनेक जण असल्याने तीन ठिकाणं बैठकी आहेत. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राजसाहेब सगळीकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून शाखा अध्यक्ष महत्त्वाचा आहे. यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद नाही. शाखाध्यक्ष महत्वाचा आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय, असं अमित ठाकरे म्हणाले.

आम्ही आमचे काम करत राहणार. मुंबईत,पुणे,नाशिक सगळीकडे बैठक आहे. लोकांना कळलं की मनसेने किती काम केले आणि आमचे काम किती मेंटेन केले. नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. मुंबईमध्ये खेळायला गार्डनदेखील कमी आहेत. सत्तेत आल्यावर सगळं करू, असं आश्वासन अमित ठाकरे यांनी दिलं.

आमच्यावर खूप केस, त्यांना आम्ही घाबरत नाही : संदीप देशपांडे 

जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.

संबंधित बातम्या   

दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस; संदीप देशपांडे आक्रमक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.