सर्वच आपले काही दुश्मन नाहीत, काय म्हणाले छगन भुजबळ

छगन भुजबळ यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.त्यांनी आता कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली पुढील रणनिती जाहीर केली आहे.त्यावरुन राज्यातील नव्या सरकार समोर पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वच आपले काही दुश्मन नाहीत, काय म्हणाले छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 3:46 PM

राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या रविवारी नागपूर राजभवनातील हिरवळीवर पार पडला. त्यानंतर मंत्रीमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना डावलले गेल्याचे पुढे आले आहे. या डावलेले गेल्यात सर्वात मोठे नाव छगन भुजबळ यांचे होते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत नाशिक येथे कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे सुरु केले आहे. आज त्यांनी नाशिकमध्ये मेळावा घेत ओबीसींचा यल्गार पुकारला आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन ओबीसींचा प्रश्न मांडणार आहोत असे सांगत छगन भुडबळ यांनी नव्या सरकारला थंडीत घाम फोडला आहे.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्री होण्याच्या संभाव्य यादीत होते.त्यांना मराठा आरक्षणा दरम्यान आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या पंगा घेतला होता. त्यांच्या मराठा नेत्याला अशा प्रकारे अंगावर घेण्याने महायुतीच्या सरकारला ओबीसींची एकगट्टा मिळाल्याची आठवण भुजबळ यांनी या मेळाव्यात करुन दिली आहे. विधानसभेच्या निवडणूका झाल्या परंतू राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका अजून बाकी असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी आपले उपद्रव्य मूल्य दाखविण्यास सुरुवात केली आहे. या नाशिक येथील मेळाव्यात भाषण करताना छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला आपला कधी विरोध नव्हता आपला विरोध केवळ आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका एवढाच आहे असेही भुजबळ यांनी सांगितले.

त्यांनाच केवळ आपला विरोध

आपल्याला सर्वच ब्राह्मणांनी काही विरोध केलेला नाही. आपले नेते महात्मा फुले यांना त्याकाळात ब्राह्मणांनी मदत केली आहे. पण काहींची मनोवृत्ती कोती असते. पण असे लोक थोडेच असतात जे सोबत असतात असे भुजबळ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की मुलींच्या शाळेला विरोध करणारे तुमच्या आमच्यातीलही होते. आपल्याला शाळेला जागा देणारे ब्राह्मण समाजाचेही लोकही होते. त्यामुळे आपले दुश्मन सर्वच नाही. आपल्याला संपवायला निघाले आहेत त्यांना आपला विरोध आहे. ज्यांना हे समतेचं चक्र उलटं फिरवायचं आहे, त्यांनाच केवळ आपला विरोध असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आरक्षणाचा उद्देश सफल झाला का ?

छगन भुजबळ पुढे म्हणाले की आरक्षण आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने एका वर्षात पाच वर्षात सर्वच प्रश्न सुटत नाही. सर्व प्रश्न असे सुटले असते तर आरक्षणाची गरज लागली नसती. दलित, आदिवासींना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. कितीतरी दलित आदिवासी समाजातील एसपी, कलेक्टर सापडतील असेही ते म्हणाले. परंतू आजही आपण झोपडपट्ट्यांत गेलो तर दलित आणि आदिवसीच सापडतात. पण भ्रम करून दिला की आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कौल दिली पण तसं नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.

दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.