रात्र वैऱ्याची आहे…उद्या 1 फेब्रुवारी… छगन भुजबळ यांच्याकडून मेसेज व्हायरल; आवाहन काय?

मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले आहेत. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल, असा मेसेज सध्या सोशल मीडियावरून तुफान व्हायरल होत आहे.

रात्र वैऱ्याची आहे...उद्या 1 फेब्रुवारी... छगन भुजबळ यांच्याकडून मेसेज व्हायरल; आवाहन काय?
chhagan bhujbal Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 10:10 PM

मुंबई | 31 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला प्रचंड यश आलं आहे. मराठा समाजाला आता ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसं नोटिफिकेशन्सच राज्य सरकारने काढलं आहे. त्यामुळे ओबीसी नेते अस्वस्थ झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांनी दंड थोपाटले आहेत. स्वत: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीही सरकारच्या निर्णयावर जाहीर नापसंती दर्शवली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या अकाऊंटवरून ओबसी समाजाला आवाहन करणारे मेसेजही व्हायरल केले जात आहेत.

काय आहे मेसेज

उद्या 1 फेब्रुवारी! मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे. या निर्णयाविरोधातील आपला रास्त संताप संववैधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे.

ओबीसींसह सर्वच मागासवर्गीय जाती-जमातींच्या बांधवांनी व संघटनांनी उद्या गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्यांचे निवेदन सुपूर्द करावे. तसेच याच दिवशी आपापल्या मतदारसंघांतील विधानसभा आमदार, विधानपरिषद आमदार तसेच खासदार यांचे कार्यालयावर किंवा निवासस्थानी निदर्शने करून त्यांनाही निवेदन द्यावे. सर्व आमदार खासदारांना ओबीसी, भटके विमुक्त हे देखील या राज्याचे नागरिक व मतदार आहेत आणि निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना त्यांचीही गरज आहे, याची जाणीव करून द्या.

ओबीसींच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य वाचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांच्या खांद्यावर आहे. उद्या आपण मागे राहिलात तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत. एकजुटीने आपली ताकद नक्की दाखवून द्या, असं आवाहन छगन भुजबळ यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.

छगन भुजबळ यांची पोस्ट येथे पाहा –

हरकती नोंदवा, कळकळीची विनंती

या शिवाय सोशल मीडियावरही ओबीसींसाठी एक मेसेज व्हायरल होत आहे. मराठा समाजाच्या सरसकट ओबीसीकरणाच्या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात जास्तीत जास्त हरकती अथवा सूचना नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यवस्थित तयार केलेले दोन मुद्देसूद मसुदे Word File/ Text format अशा दोन्ही प्रकारांत दिले आहेत. दोन्हीपैकी एक मसुदा घेऊन पत्र किंवा E- mail या माध्यमातून आपण आपल्या नावाने हरकती नोंदवाव्यात, असे कळकळीचे आवाहन आहे, असं आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आलं आहे. मसुद्यानुसार आवर्जून हरकती नोंदवा आणि ही माहिती मसुद्यासह इतरांनाही पाठवा! आपला एक प्रतिसाद आपल्या पुढील पिढीचे भवितव्य वाचविण्यासाठी मोलाचा ठरू शकतो!, असंही या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

रात्र वैऱ्याची आहे… तातडीने पावलं उचला!

ओबीसी बांधवांनो आपल्या सर्वांसाठी रात्र वैऱ्याची आहे. आपल्यावर आलेल्या या झुंडशाहीच्या संकटाला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला तातडीने कायदेशीर मार्गाने प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे! छगन भुजबळ यांनी केलेल्या आवाहनानुसार ओबीसी समाजातील प्राध्यापक, वकील, शिक्षक यांच्यासह इतर सर्व सुशिक्षित बांधवांनी तातडीने आपल्या हरकती नोंदवा!! मराठा समाजाचा ओबीसींमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी सगेसोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने जो नियमांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याने त्या मसुद्याला विरोध करण्यासाठी 16 फेब्रुवारी 2024 पूर्वी खालील पत्यावर जास्तीत हरकती किंवा सूचना पाठविण्यात याव्या, असं आवाहनही दुसऱ्या एका मेसेजमध्ये करण्यात आलं आहे.

हरकती किंवा सूचना पाठविण्याचा पत्ता:

मा. सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, दालन क्र. 136 व 137, पहिला मजला, मंत्रालय विस्तार इमारत, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- 400 032

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.