AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेचा झाला’, एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्लाबोल

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप खडसेंनी केलाय.

'भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेचा झाला', एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्लाबोल
एकनाथ खडसे
| Updated on: May 10, 2021 | 6:48 PM
Share

जळगाव : पूर्वाश्रमीचं भाजपचं राज्यातील सर्वात मोठं नाव आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपनं नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या काही वर्षात भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात केलं जात असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केलाय. (OBC leaders are being targeted in the BJP, Allegation of Eknath Khadse)

गेल्या 4 – 5 वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, असा आरोपही खडसे यांनी केलाय. भाजपमध्ये असताना नाराज एकनाथ खडसे यांनी फडणवीसांविरोधात मोर्चा वळवला होता. फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप करत त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खडसे – महाजन वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात व्हायरल ऑडियो क्लीपवरुन सुरु झालेला वाद आता जास्त रंगण्याची शक्यता आहे. कारण महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केल्यानंतर खडसे यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकता”, असं खडसे म्हणाले आहेत. तसेच गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असं मोठं विधान खडसे यांनी केलं आहे.

महाजनांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर

“मुख्यमंत्रीपदाचे स्वप्ने पाहणे काय गैर आहे? गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही. मी कोणाचे पाय चाटत नाही. त्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही. पहिले आपल्या मतदारसंघात पाहा”, असं सडेतोड प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना आणि सगळ्यांना कोण काय आणि कोण काय नाही ते माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत”, असं म्हणत महाजन यांनी खिल्ली उडवली.

संबंधित बातम्या :

‘तो फक्त पोरींचे फोन उचलतो’, खडसेंच्या ऑडिओ क्लिपला गिरीश महाजनांचं सडेतोड उत्तर

‘गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो, फक्त पोरींचे फोन उचलतो’, एकनाथ खडसेंची वादग्रस्त ऑडिओ क्लीप व्हायरल

OBC leaders are being targeted in the BJP, Allegation of Eknath Khadse

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.