ओबीसी आरक्षणासाठी नांदेड आणि हिंगोलीत खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा खासदारांनी संसदेत मांडावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी नांदेड आणि हिंगोलीत खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन
ओबीसी संघटनेचं आंदोलन
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 5:41 PM

नांदेड : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे विविध ओबीसी संघटनांकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा खासदारांनी संसदेत मांडावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. दुसरीकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोरही ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाओ आंदोलन केलं. (OBC organizations are aggressive for political reservation of OBCs)

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा खासदारांनी संसदेत उपस्थित करावा. सोबतच ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी संसदेत करावी अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज नांदेडचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर 2 तास ढोल बजाओ आंदोलन केलं. त्यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली. खासदारांनी लवकर हे मुद्दे मांडले नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी ओबीसी संघटनेनं दिला आहे.

‘ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल’

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल लातूरमधील ओबीसी मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय. ओबीसींचं आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका, असा इशारा पंकजा यांनी दिलाय. त्याचबरोबर मराठा आरक्षणालाही आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. लातूरमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात मोठ्या संख्येनं भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी धनंजय मुंडेंवरही टीका केलीय.

ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका. ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे. तर यातून काही सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय…आम्ही मुंबईत 10 लाख लोकं बोलवू शकतो. आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो ही एक दिवस येईल. ओबीसी शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

इतर बातम्या :

‘ताकद पहायची असेल तर उजनी धरण ओलांडून दाखवा’, माजी मंत्री तानाजी सावंतांचा दत्तात्रय भरणेंना सज्जड दम!

दत्तात्रय भरणेंना सोलापुरात फिरू देणार नाही; शिवसेना नेत्यांचा इशारा

OBC organizations are aggressive for political reservation of OBCs

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.