OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरुन राज्य विरुद्ध केंद्र, बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका, भुजबळांची केंद्रावर टीका
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोग करत असलेल्या कामावर प्रश्न उपस्थित केलेआहे. तर राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी आरक्षणावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.
औरंगाबाद : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekar Bawankule) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maharashtra state Govenment) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडलंय. यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष पेटल्याचं दिसतंय. ओबीसी आरक्षणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘राज्य सरकार ओबीसी समाजाविरोधात आणखी एक षड्यंत्र करतंय. राज्य ओबीसी आयोग 1960 ते 1994 या काळातील ग्राम पंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद सदस्यांची गोपनीय माहिती गोळा करत आहेत. ओबीसी समाजाविरोधात हे सरकार काही षड्यंत्र असलेल्याचं यावरुन दिसतेय. गरज नसताना अशाप्रकारे जातीनिहाय माहिती मागणे गरजेचं नाही. आरक्षणातून ओबीसींच्या काही जातींना डावलण्याचं डाव तर नाही ना?’ असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. तर यावेळी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ओबीसी मंत्र्यांनी लक्ष द्यावं. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने चांगली बाजू मांडावी. आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकारला सोडणार नाही’ असं बावनकुळे यावेळी म्हणालेत.
राज्य सरकार विरुद्ध केंद्र
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोग करत असलेल्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहे. तर राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी आरक्षणावर भाष्य केलंय. यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष पेटल्याचं दिसतंय.
भुजबळ काय म्हणालेत?
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले की, ‘जे हे स्वतःला ओबीशी म्हणवतात त्यांनी तरी किमान ‘शेतकऱ्यांचा आसूड’ आणि ‘गुलामगिरी’ ही दोन पुस्तके वाचली पाहिजेत. महात्मा फुले मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. खडकवासला धरण आणि अनेक रस्त्यांची कामे केली. शाहू, फुले, आंबेडकर आमचे देव आहेत. बाकीच्यांना पुजायचं की नाही बघा पण यांची पूजा झाली पाहिजे. प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुले दलितांच्या वस्तीत जाऊन रुग्ण घेऊन यायच्या. प्रश्न राजकीय आरक्षणाचा आहे. आजही झारीतील शुक्राचार्य अनेक ठिकाणी बसले आहेत आणि ते आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करतात, पण आजही ही माहिती नाही ती माहिती नाही, असं सांगून आरक्षण टाळतात.’ असं भुजबळ म्हणालेत.
भुजबळांची केंद्रावर टीका
महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ ओबीसी आरक्षणावरुन केंद्रावर टीका करताना म्हटले आहे की, ‘भारताची जनगणना अजूनही केलेली नाही कारण कोरोना ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डाटा देत नाहीत. कारण, तो दुरुस्त नाही सांगितला जातो. मात्र, तोच डाटा उज्वला गॅस योजनेसाठी तिकडे का चालतो. ओबीसींचा डाटा गोळा केला नाही मग 2011 ते 2016 तुम्ही काय केलं?, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे बावनकुळेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे छगन भुजबळांनी केंद्रावर टीकास्त्र सोडलंय.
इतर बातम्या
राज्यावर वीज कपातीचे संकट; दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा;नितीन राऊत
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या
तुम्हाला जर ‘या’ समस्या असतील तर, टोमॅटोपासून नेहमी अंतर ठेवून रहा