Rupali Chakankar : रुपाली चाकणकर धमकी प्रकरणी एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाने राज्यातील पोलिसांना आणि महिला आयोगाला याबाबत माहिती दिली होती. तसेच रूपाली चाकणकर यांची सुरक्षा वाढविण्याच्या सुचना दिल्या होत्या.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर धमकी (threatened) देणारी व्यक्ती ही नगरची असल्याचे कळत आहे. तर त्या व्यक्तीला काल संध्याकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. शिंदे याने धमकीचा फोन करून चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू अशी धमकी दिली होती. त्या धमकीमुळे राज्यात खळबळ माजली होती. त्यामुळे चाकणकर यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली होती. तर धमकी प्रकरणी चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे.
अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिली होती धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवेमारण्याची धमकी दिली होती. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. त्यानंतर त्यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली होती. तर याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यातक्रारीवरून धमकी देणारा हा नगरचा असल्याचे समजते. तसेच तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असल्याचे समोर येत असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी रात्रीच अटक केले आहे.
चाकणकर यांची सुरक्षा वाढविण्याच्या सुचना
शिंदे याने चाकणकर यांना धमकीचा फोन करून पुढील 72 तासात जीवे मारू अशी धमकी दिली होती. त्याने दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करत ही धमकी दिली होती. ज्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाने राज्यातील पोलिसांना आणि महिला आयोगाला याबाबत माहिती दिली होती. तसेच रूपाली चाकणकर यांची सुरक्षा वाढविण्याच्या सुचना दिल्या होत्या.
दरम्यान सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला गती दिली. तसेच हेल्पलाइन नंबरवर ज्या नंबर वरून फोन करण्यात आला होता. त्याची माहिती घेतली असता ती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे उघड झाली झाले. तर नगर जिल्ह्यातील पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवत त्या व्यक्तीचा शोध घेतला. तसेच नगर जवळील चिचोंडी पाटील या गावातील भाऊसाहेब शिंदे याला ताब्यात घेतले.