एक लाख कोटींची अर्थव्यवस्था हे फडणवीस सरकारचं गिमीक : जयंत पाटील
अर्थमंत्री जयंत पाटील यांनी "एक लाख कोटींची अर्थव्यवस्था हे गिमीक" असल्याचे नुकतंच म्हटलं (Jayant patil criticized a trillion dollar economy fadnavis statement) आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 2025 पर्यंत महाराष्ट्राला एक लाख कोटींची अर्थव्यवस्था (Jayant patil criticized a trillion dollar economy fadnavis statement) असणारे राज्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र हे उद्दिष्ट आता आघाडी सरकार गुंडाळणार असल्याचे दिसून येत आहे. कारण अर्थमंत्री जयंत पाटील यांनी “एक लाख कोटींची अर्थव्यवस्था हे गिमीक” असल्याचे नुकतंच म्हटलं (Jayant patil criticized a trillion dollar economy fadnavis statement) आहे.
“मंदी आणि विकास दरामुळे 1 लाख कोटींची अर्थव्यवस्था अशक्य असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच महसूली तूट ही 43 हजार कोटींवर गेली आहे. तर वित्तीय तूटही 62 हजार कोटींवर गेल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली आहे.”
तसेच त्यांनी 7 व्या वेतन आयोगाचा वर्षाला 29 हजार कोटींचा खर्च होत असल्याचीही माहिती दिली आहे. त्यामुळे आघाडी सरकारकडून खर्चाला आळा घालणं सुरु असल्याचेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे आघाडी सरकार फडणवीस सरकारच्या 1 लाख कोटींची अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट इतर योजनांप्रमाणे गुंडाळणार असल्याचे दिसत (Jayant patil criticized a trillion dollar economy fadnavis statement) आहे.
“महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी कृषी क्षेत्रातील 50 लाख लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन सेवा क्षेत्रात आणणार असल्याचे फडणवीस म्हणाले होते.” मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 या गुंतवणूकदारांच्या परिषददरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले होते.