राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा […]

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 9:28 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलाय. त्यांनी यावेळी जवळपास साडे चार लाखांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. तर जळगावचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील यांनीही 4 लाख 10 हजाराच्या फरकाने विजय मिळवला.

शिवसेना आणि भाजपने अनुक्रमे 23 आणि 25 जागांवर उमेदवार उतरवले होते. भाजपने सर्वाधिक यश मिळवत 23 उमेदवार विजयी झाले आहेत. तर फक्त दोन उमेदवारांचा पराभव झाला. बारामतीमधून कांचन कुल आणि चंद्रपुरातून हंसराज अहिर यांचा पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीत भाजपने अगोदरपासूनच विजयाचा दावा केला होता, पण सुप्रिया सुळेंनी एकतर्फी विजय मिळवला.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव

केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. काँग्रेसला राज्यात चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वांचा पराभव झालाय. त्यात चंद्रपूरमध्ये आश्चर्यकारक विजय मिळाला, ज्यात केंद्रीय मंत्र्यांचाच पराभव झाला.

बारामतीत एकतर्फी लढत

2014 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुप्रिया सुळेंची दमछाक केली होती. पण यावेळी सुप्रिया सुळेंनी सहज विजय मिळवला. भाजपने बारामतीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मोठं आव्हान निर्माण करण्यात यश आलं असलं तरी सुप्रिया सुळेंनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलंय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.