राज ठाकरेंच्या ‘त्या’ भुमिकेनंतर मुस्लीम कार्यकर्ते नाराज, 35 जणांनी दिला मनसेचा राजीनामा

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशिदिबाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत देखील राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहेत.

राज ठाकरेंच्या 'त्या' भुमिकेनंतर मुस्लीम कार्यकर्ते नाराज, 35 जणांनी दिला मनसेचा राजीनामा
राज ठाकरे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 8:18 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईमध्ये (MUMBAI)  सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशिदिबाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत देखील राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मशिदिबाहेरील भोंग्यांच्या वक्तव्यावरून पक्षातील मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि मराठवाड्यातील 35 मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांच्यासोबत 35 जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लीम कार्यकर्ते मनसेला जोडले गेलेले आहेत. मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर ते पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे.

फिरोज खान यांचा राजीनामा

मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांनी देखील राजीनामा दिला आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून मनसेसोबत काम करत आहे. मात्र राज साहेब ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे काम करणं कठीण झाले आहे. ज्या कुटुंबाने मला तुमच्यासोबत काम करण्याची प्रेरणा दिली, मात्र आता त्यांच्याकडूनच विरोध होत आहे. मी एक मनसेचा सामान्य कार्यकर्ता आहे, अनेक आंदोलनात सहभागी झालो. मात्र बदललेल्या भूमिकेमुळे मला राजीनामा द्यावा लागत आहे. मला अशा आहे की, तुम्ही राज्यासाठी आणि मराठी बांधवांसाठी काम करत राहाल. माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करावा असे फिरोज खान यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित  करत मशिदिवरील भोंगे उतरवले जावे असे म्हटले होते. तसेच जिथे भोंग चालू राहातील तिथे आम्ही हनुमान चालीसा लावू असे म्हटले होते. ठाण्यामध्ये झालेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज ठाकरे हे आपल्या वक्तव्यावर ठाम होते. त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली असून, आज जवळपास 35 कार्यकर्त्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.

संबंधित बातम्या

फसवणाऱ्यांना दिलासा ! माय लॉर्ड, हे काय ? सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका

Video Chandrasekhar Bavankule | महाराष्ट्र होरपळतोय ऊर्जा व महसूल मंत्रालयाच्या वादात; नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात, त्वरित 20 हजार कोटी देण्याची मागणी 

Raj Thackeray : पुण्यातील राजकीय वातावरण तापणार! राज ठाकरेंचा 16 एप्रिलला दौरा, सामुहिक हनुमान चालीसा पठण होणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.