Lok Sabha Election : 2024 च्या निवडणुकांना घेऊन ओवेसींचे मोठे विधान, भाजपमुक्त सरकारचा काय सांगितला ‘फॉर्म्युला’
आता भाजपापासून दूर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधकांना एकवटण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण इतिहास पाहिला तर ते 2002 च्या दंगलीच्या वेळी ते भाजपसोबत होते. एवढेच नाहीतर त्यांनी भाजपसोबत सरकारही स्थापन केले. त्यानंतर 2015 भाजपापासून वेगळे झालेले नितीशकुमार हे 2017 ला पुन्हा मोदींसोबत जाऊन सत्ता स्थापन केली.
हैदराबाद : (Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आतापासूनच तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवाय (BJP Party) भाजपाने आपली रणनीती आखली असून त्यानुसार कामाला सुरवातही केली आहे. 2024 मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर आतापासूनच योग्य ते नियोजन असणे गरजेचे असल्याचे एआयएमआयएम चे (Asaduddin Owaisi) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे. शिवाय भाजपाचा निवडणुका लढण्याचा अंदाज हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यांना विरोध करण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्षाने एकत्र येऊन अस्तित्व पणाला लावले तरच 2024 मध्ये भाजप हा सत्तेपासून दूर राहू शकतो. केवळ मोदींच्या चेहऱ्याचा उपयोग इतर भाजपाच्या उमेदवारालाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी एकत्र येणे हाच पर्याय
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला रोखायचे असल्यास प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढून आपली शक्ती वाया न घालवता सर्व विरोधकांनी एकत्र येऊनच लढा उभारणे गरजेचे आहे.तरच भाजपाचा पराभव होईल, शिवाय भाजपाला टक्कर देण्यासाठी लोकसभेच्या सर्वच्या-सर्व म्हणजे 540 जागा लढवणे गरजेचे आहे. एका वाहिनीच्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.
नितीश कुमारांचा भरवसाच नाही..!
आता भाजपापासून दूर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधकांना एकवटण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण इतिहास पाहिला तर ते 2002 च्या दंगलीच्या वेळी ते भाजपसोबत होते. एवढेच नाहीतर त्यांनी भाजपसोबत सरकारही स्थापन केले. त्यानंतर 2015 भाजपापासून वेगळे झालेले नितीशकुमार हे 2017 ला पुन्हा मोदींसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. आता काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यामुळे त्यांचा भरवसा नसल्याते ओवेसी यांनी सांगितले.
पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?
सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढा उभा केला तरी पंतप्रधानासाठी उमेदवार कोण असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर ओवेसी यांनी सावध उत्तर दिले असून त्यांनी ममता बॅनर्जी, नितीश कुमार, राहुल गांधी, केसीआर यांची नावे पुढे केली आहेत. मात्र, त्यांनी आपल्या नावाचा उल्लेखही केला नाही.
एआयएमआयएम चा स्वत:चा अजेंडा
एआयएमआयएम ला भाजपची ‘बी’टीम म्हणून सातत्याने हिणवलं जाते. पण हे सर्व आरोप करण्यापुरते मर्यादित असून आमच्या पक्षाला स्वतंत्र विचारधारा आहे. आमचा अजेंडा स्पष्ट असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे.