मुंबईतील जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित, खासदार राहुल शेवाळेंकडून कामाची पाहणी
नव्या विषाणूचा (new corona variant) संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी मुंबईला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईत नवा जंबो ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील माहुल परिसरातील या ऑक्सिजन प्लांट ला भेट देऊन खासदार राहुल शेवाळे यांनी इथल्या कामाचा आढावा घेतला.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि मुंबई महानगरपालिका सतर्क झाली आहे. नव्या विषाणूचा (new corona variant) संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी मुंबईला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईत नवा जंबो ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील माहुल परिसरातील या ऑक्सिजन प्लांट ला भेट देऊन खासदार राहुल शेवाळे यांनी इथल्या कामाचा आढावा घेतला.
या पाहणीवेळी भारत पेट्रोलियम चे सिजिएम् श्री एन चंद्रशेखर, डिजीएम श्री पांचाळ, सीएम श्री उदय कैकानी, नगरसेवक श्रीकांत शेट्ये, पालिकेचे अधिकारी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शेवाळे यांच्या सूचनेनुसार भारत पेट्रोलियम आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लवकरच सुरू होणाऱ्या या प्लांट मधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे.
शेवाळेंच्या आवाहनला भारत पेट्रोलियमचा प्रतिसाद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ‘मिशन ऑक्सिजन’ ची घोषणा करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील मोठ्या कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने या जंबो ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीला तीन महिन्यांपूर्वी सुरुवात केली असून लवकरच हा प्लांट सुरू केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या निर्देशानुसार या प्लांट मधून मुंबईतील मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. याप्रमाणेच खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरसीएफ कंपनीने गोवांडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू केला आहे.
‘मुंबईत वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही’
नव्या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप देशात सापडला नसला तरीही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोविड टास्क फोर्स ने संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला असून सर्वतोपरी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्भूमीवर हा जंबो ऑक्सिजन प्लांट भविष्यात मुंबईत वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासू देणार नाही, याचा मला विश्वास आहे.
जंबो ऑक्सिजन प्लांटची वैशिष्टे
>> माहुल, चेंबूर येथे पालिकेच्या जागेवर प्लांट उभारण्यात आला आहे.
>> व्ही पी एस ए टेक्नॉलॉजी द्वारा ऑक्सिजन निर्मिती
>> भारत पेट्रोलियम च्या वतीने एक आणि पालिकेच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉम्प्रेसर यंत्रणा बसविण्यात आली आहे.
>> प्रकल्पाचा खर्च अंदाजे 15 कोटी रुपये.
>> 14 लिटर चा एक याप्रमाणे तासाला सुमारे 50सिलेंडर
>> दिवसाला सुमारे 1500सिलेंडर चा पुरवठा केला जाणार
>>लोकमान्य टिळक रुग्णालय आणि इतर मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा
इतर बातम्या :