AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार पुन्हा आले!; सामना अग्रलेखावर शरद पवार यांची 3 ओळींची प्रतिक्रिया

Sharad Pawar on Saamana Editorial : शरद पवारांचा राजीनामा अन् माघार सामना अग्रलेखातून विरोधांना आव्हान; शरद पवार यांची 3 ओळींची प्रतिक्रिया

पवार पुन्हा आले!; सामना अग्रलेखावर शरद पवार यांची 3 ओळींची प्रतिक्रिया
| Updated on: May 08, 2023 | 11:29 AM
Share

पंढरपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. सांगोल्यात आज बाबुराव गायकवाड यांच्या पंच्चाहत्तरीचा कार्यक्रम होतोय. शरद पवार यांच्या हस्ते बाबुराव गायकवाड यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमात शरद पवार आणि आमदार शहाजीबापू पाटील एकाच मंचावर आहेत. शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आजच्या सामनाच्या अग्रलेखावरही शरद पवार बोललेत.

सामनावर पवार काय म्हणाले?

सामनाचा आजचा अग्रलेख मी काही वाचला नाही. वाचल्यावर यावर मी माझं मत देईल. सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करत असतो. पण संपूर्ण माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करणं, योग्य राहील. नाहीतर उगीच गैरसमज होतात. माझी खात्री आहे, त्यांची भूमिका ऐक्याला पूरक असेल, असं शरद पवार म्हणालेत.

आजच्या सामनात नेमकं काय?

पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे, याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्रातले, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो! सर्वच पक्षांतील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण?, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलंय.

फडणवीसांना टोला

आता मी निपाणीला जात आहे. कोण पार्सल आहे, कोण किती वर्षाचे आहे ते तिथे गेल्यावर सांगतो, असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

नितीश कुमार यांचा 11 मेला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. यावर शरद पवार बोललेत. या देशात पर्याय देण्याची गरज आहे. लोकांना विश्वास देण्याची गरज आहे. त्या कामात जे प्रयत्न करतील. मग नितीश कुमार असो किंवा ममता बॅनर्जी किंवा अन्य असो त्या सगळ्यांना साथ देणे सहकार्य करणे ही माझी भूमिका आहे, असंही शरद पवार म्हणालेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.