ज्यांच्यावर छापे, ‘ते’ साखर सम्राट, रोहित पवारांच्या जवळचे.. भाजपात? धो डाला?

अभिजित पाटील यांनी नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. या दोहोमध्ये जवळीक वाढल्याचेही चित्र आहे.

ज्यांच्यावर छापे, 'ते' साखर सम्राट, रोहित पवारांच्या जवळचे.. भाजपात? धो डाला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 2:19 PM

रवी लव्हेकर, पंढरपूरः थोडक्याच काळात महाराष्ट्रातील साखर सम्राट अशी ओळख मिळवलेले अभिजित पाटील (Abhijit Patil)  हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अगदी महिनाभरापूर्वीच अभिजित पाटील यांच्या विविध साखर कारखान्यांवर आयटी विभागातर्फे धाड टाकण्यात आल्या होत्या. मात्र ही नुसती चौकशी असून मी अधिकाऱ्यांच्या चौकशीला पूर्ण उत्तरं दिली आहेत, असं त्यावेळी अभिजित पाटील यांनी म्हटलं होतं. अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या अगदी जवळचे मानले जातात. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. अभिजित पाटील यांनी नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. या दोहोमध्ये जवळीक वाढल्याचेही चित्र आहे.

सांगोल्यात चंद्रकांत पाटील यांची आणि अभिजित पाटील यांच्या भेटीची जोरदार चर्चा आहे. यावेळी काय झाडी काय डोंगर वाले सांगोल्याचे फेमस आमदार शहाजीबापू पाटीलही उपस्थित होते.

अभिजित पाटील यांच्याविरोधात झालेल्या छापेमारीनंतरच ते भाजपात येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पाटील यांच्याविरोधात नेमकं काय हाती लागलं, याची माहिती उघड झालेली नव्हती. मात्र पाटील यांना क्लिनचिट मिळेल, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं होतं…

अभिजित पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं होतं. आता त्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या संदर्भाने पुन्हा एकदा लाँड्री मशीन, धो डाला… अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Abhijit patil

कोण आहेत अभिजित पाटील?

अभिजित पाटील हे मूळचे पंढरपूर येथील आहे. 10 वर्षातच त्यांनी साखर सम्राट अशी नवी ओळख निर्माण केली. पंढरपुरात त्यंनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भालके गटाला पराभूत करत 21 पैकी 20 जागा काबीज केल्या होत्या. त्यानंतर ते जास्त प्रकाशझोतात आले होते. सध्या त्यांच्या ताब्यात 5 साखर कारखाने आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सह. साखर कारखाना, नाशिक, नांदेड आणि उस्मानाबादेतील धाराशिव येथेही त्यांचा एक साखर कारखाना आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अभिजित पाटील यांच्याविरोधात आयकर विभागाची छापेमारी झाली. यावेळी ते अडचणीत सापडल्याचे दिसत होते.

मात्र चौकशीनंतर अभिजित पाटील यांनी टीव्ही9 लाच मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी माझ्याविरोधातील चौकशीत काही आढळलं नाही, असं म्हटलं होतं.

तसेच विरोधकांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं असून त्यांची नावं वेळीच उघड करीन, असंही त्यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.

अभिजित पाटील यांच्या चौकशीनंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच पाटील भाजपात येणार अशी चर्चा सुरु झाली होती.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.