पापा, आपके निशान मेरा रास्ता हैं…; राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी राहुल गांधी भावूक

Rahul Gandhi on Rajiv Gandhi Birth Anniversary : तुमच्या डोळ्यातील भारताची स्वप्न, आठवणींमध्ये आहेत, मी ती समजून घेतोय; वडिल राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी राहुल गांधी यांचं भावनिक ट्विट

पापा, आपके निशान मेरा रास्ता हैं...; राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी राहुल गांधी भावूक
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 10:33 AM

Rajiv Gandhi Birth Anniversary : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन केलं जात आहे. राजीव गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही आपल्या वडिलांना आदरांजली अर्पण केली आहे. लडाखमध्ये 14 हजार 270 फूटांच्या उंचीवरून राहुल गांधी यांनी राजीव गांधी यांना नमन केलं आहे. ट्विट करत राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी यांनी लडाखमधील पैंगा त्से झील तलावाच्या किनाऱ्यावर राहुल गांधी यांच्या फोटोला राहुल गांधी यांनी अभिवादन केलं. त्याचा व्हीडिओ आता समोर आला आहे.

तर राहुल गांधी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाबा, तुमच्या डोळ्यात भारतासाठी स्वप्न होती. या अनमोल आठवणींमधून ती स्वप्न दिसतात. तुमच्या खुणा माझा रस्ता आहे. प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि त्यांच्या स्वप्नांना मी समजून घेत आहे. मी भारतमातेचा आवाज ऐकतो आहे, असं राहुल गांधी म्हणालेत. राजीव गांधी यांच्या स्मृती जागवणारे फोटोंचा व्हीडिओ राहुल गांधी यांनी शेअर केलाय.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे. 21व्या शतकातील भारताचे शिल्पकार राजीव गांधी यांना ‘माहिती तंत्रज्ञानाचे जनक’ म्हणून गौरवलं जातं. एक उत्कृष्ट नेता, त्यांच्या दूरदृष्टीने भारतीय राजकारणावर आपली छाप सोडली. भारताच्या सर्वात तरुण पंतप्रधानांना आमची मनापासून श्रद्धांजली, ज्यांनी देश कायमचा बदलला, असं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.