Pankaja Munde : ‘मला माझ्या भविष्याची चिंता नाही, संधीचं सोनं करायचं शिकले आहे’, शिवराजसिंह चौहानांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य

'उद्या काय होणार, काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं यापेक्षा काय हवं. या पराभवानं मला दिल्लीला नेलं. शिवराजसिंहांसारखे सात्विक लोक लाभले'.

Pankaja Munde : 'मला माझ्या भविष्याची चिंता नाही, संधीचं सोनं करायचं शिकले आहे', शिवराजसिंह चौहानांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य
पंकजा मुंडे, भाजप नेत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 4:26 PM

परळी : भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुण्यस्थितीनिमित्त गोपीनाथ गडावर स्मृतीदिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivrajsingh Chauhan) यांनी उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. सध्या विधान परिषद निवडणूक लागली आहे. त्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय? पण माझी चिंता करुन नका. उद्या काय होणार, काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं यापेक्षा काय हवं. या पराभवानं मला दिल्लीला नेलं. शिवराजसिंहांसारखे सात्विक लोक लाभले’.

पंकजा मुंडे यांनी शिवराज सिंह चौहान यांचं गोपीनाथ गडावर स्वागत केलं. ‘ज्यांच्या नावातच शिव आणि जनतेच्या मनात ज्यांचं राज आहे अशा शिवराजसिंह चौहान यांचं मी स्वागत करते. सकाळपासून लोक तुमच्या प्रतिक्षेत आहे. तुमचं आमचं नातं मुंडे साहेबांपासून आहे. इथे तुम्ही मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला आला होता. त्याच ठिकाणी आज तुम्ही आला आहात. तुम्ही मध्यप्रदेशात जी किमया करुन दाखवली, जे इतर कोणत्याही राज्याला जमलं नाही. तुम्ही ओबीसी आरक्षण टिकून धरलं. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी, प्रेरणा लाभो. शिवराजसिंह चौहान यांची प्रेरणा घेऊन त्यांनी ओबीसींची आरक्षण मिळवून द्यावं. राजकारणासाठी नाही तर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण हवं, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

‘जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला’

गरीब आणि वंचितांचे नेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यासोबत नाहीत. पण आज शिवराजसिंहांसारखे लोक आमच्यासोबत जोडले जातात. तेव्हा आजही मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं. आज मला त्या दिवसाची आठवण येते. आज 8 वं पुण्यस्मरण आहे मुंडे साहेबांचं. मोदी सरकारलाही 8 वर्षे झाली आहेत. जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला. हा गोपीनाथ गड माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी आहे जे सकाळपासून तुमची वाट पाहत आहेत. मी मध्यप्रदेशची प्रभारी असेन नसेन पण तुमच्याशी जोडलेले आमचं नातं कायम राहील, अशा शब्दात पंकजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

‘3 जूनचा सूर्य काळाच दिवस घेऊन उगवला’

पुण्यस्मरणाच्या दिवशी गंभीर असलेल्या ताई आज आनंदी दिसत आहेत. सुर्योदय कधी काळा असतो का असं मला विचालं तर 3 जूनचा सूर्य काळाच दिवस घेऊन उगवला असं मी म्हणेल. आज मोहन भागवतांनी सांगितलं की आम्ही मुस्लिमविरोधी नाही. आम्हाला तो वाद मिटवायचा आहे. तेच काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. ते हिंदू मुस्लिम भेद करत नव्हते. समाजाची सेवा हाच त्यांचा धर्म होता, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.