पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय, उद्या होणाऱ्या BDCC निवडणुकीवर बहिष्कार

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Beed District Central Co-operative Bank) निवडणुकीवर भाजपने (BJP) बहिष्कार टाकला आहे.

पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय, उद्या होणाऱ्या BDCC निवडणुकीवर बहिष्कार
पंकजा मुंडे, भाजप
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 10:11 AM

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Beed District Central Co-operative Bank) निवडणुकीवर भाजपने (BJP) बहिष्कार टाकला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी याबाबतची घोषणा केली. उद्या म्हणजेच 20 मार्च (BDCC) रोजी ही निवडणूक होत आहे. मात्र ही निवडणूक नव्याने घेण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला.

पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकी संदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली.

धनंजय मुंडेंची जय्यत तयारी

दरम्यान, महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. 20 मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व संचालक उमेदवारांची काल बैठक घेतली. महाविकास आघाडीमार्फत शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचा परिचय आघाडीतील सर्व तालुक्यातील प्रमुखांशी करून देण्यात आला. बीडमधील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक पार पडली.

संबंधित बातम्या  

बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान; पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार?; जळगाव प्रकरणावरून पंकजा मुंडे संतापल्या

संजय राठोडांनी राजीनामा दिला हे योग्यच; आता या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी: पंकजा मुंडे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.