AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; तर बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलंय. लातूरमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय.

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; तर बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 7:12 PM
Share

लातूर : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्यावरुन धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे. याबाबत विचारलं असता चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलंय. लातूरमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीवरुन धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय. (Pankaja Munde denied the allegation of alleged Chikki scam)

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलिही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलिही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसंच बीड जिल्ह्यात जनता, व्यापारी, व्यावसायिक प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. वाळूमाफिया वाढले आहेत. अवैध दारु, मटक्याचे अड्डे वाढले आहेत. आम्ही रोज पोलिसांना बोलतोय. हे सर्व बीड जिल्ह्यासाठी हानीकारक आहे, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केलाय.

धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना टोला

मुंबई हायकोर्टाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत, आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असा घणाघाती आरोप केला होता.

कथित चिक्की घोटाळा नेमका काय आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात अत्यंत खळबळजनक माहिती उजेडात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इत्यादी वस्तूंची तब्बल 206 कोटींची खरेदी केल्याचे समोर आले होते. या खरेदीसाठी एका दिवसात 24 आदेश काढल्याचाही आरोप झाला होता. या खरेदीत नियमभंग केल्याचाही आरोप झाला होता. याचं कारण 3 लाख रुपयांच्यावरची खरेदी ई-टेंडरद्वारे करण्याचा नियम आहे.

दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. शिवाय, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली होती.

इतर बातम्या :

क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील आक्रमक, स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार

‘महामार्गांच्या कामाला शिवसेनेचा विरोध नाही’, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाशिमच्या सेना लोकप्रतिनिधीचा दावा

Pankaja Munde denied the allegation of alleged Chikki scam

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.