एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी; पंकजा मुंडे म्हणाल्या…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. खडसेंना पुन्हा ईडीकडून बोलावणं येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (pankaja munde)

एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी; पंकजा मुंडे म्हणाल्या...
pankaja munde
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 4:05 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. खडसेंना पुन्हा ईडीकडून बोलावणं येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. (pankaja munde reaction on eknath khadse’s ed probe)

एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू होत असून हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. खडसे यांनीही या कारवाई मागे राजकीय सुडाचा वास येत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर पंकजा मुंडे यांना विचारण्यात आल. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मला वाटतं ईडी, सीबीआय, सीआयडी या मोठ्या संस्था आहेत. त्यात आपण कमी बोलू तेवढं योग्य आणि न्याय होईल. चूक असेल तर त्याचा न्याय होईल. बरोबर असेल तर त्याचाही न्याय होईल. त्याला आपण कुठे डिस्टर्ब करू नये. खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही, असं पंकजा म्हणाल्या.

पुनर्वसन शब्द मान्य नाही

प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. म्हणून नाराज होण्याचं कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझं घर वाहून गेलं नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचं पुनर्वसन केलं जातं. पुनर्वसन शब्द मला मान्य नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. माझ्या मनात कोणतीही आपत्ती नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अशा निर्णयातून मी गेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असते. नाराजी असते. हे नाकारता येत नाही. पण माझ्या आणि कुटुंबाच्या मनात नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तोपर्यंत निवडणुका नकोच

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. ओबीसींचं आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. तो ओबीसींवर घोर अन्याय होईल. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सरकारने तात्काळ पावलं उचलून हे थांबवणं आवश्यक आहे. या पोटनिवडणुका आहेत. मुख्य निवडणुकांच्या आधी तरी सरकारचा इम्पिरीकल डेटा आणि त्याचा अभ्यास होणं हे शंभर टक्के अपेक्षित आहे, असं पंकजा म्हणाल्या. (pankaja munde reaction on eknath khadse’s ed probe)

संबंधित बातम्या:

मुख्य निवडणुका होण्याआधीच इम्पिरीकल डेटा पूर्ण करा, नव्या मंत्र्यांकडून ओबीसींच्या खूप अपेक्षा: पंकजा मुंडे

‘बाहेर’च्या नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे भाजपची मतं वाढण्याची शक्यता नाही?; पंकजा मुंडेंचं मिश्किल उत्तर

Maharashtra News LIVE Update | जळगावात दहा दिवसांनंतर पावसाची हजेरी

(pankaja munde reaction on eknath khadse’s ed probe)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.