Pankaja Munde : पंकजा मुंडे समर्थकांचा भागवत कराडांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न, कराडांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, पोलिसांमुळे अनर्थ टळला!

औरंगाबादेत पंकजा मुंडे समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याची भनक आधीच लागल्यामुळे कराड यांचे समर्थक जमा झालेले होते. त्यावेळी कराडांच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण झाली.

Pankaja Munde : पंकजा मुंडे समर्थकांचा भागवत कराडांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न, कराडांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, पोलिसांमुळे अनर्थ टळला!
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:27 PM

औरंगाबाद : विधान परिषद निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्याचे पडसाद आता राज्यभरात पाहायला मिळत आहेत. आज औरंगाबादेत पंकजा मुंडे समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याची भनक आधीच लागल्यामुळे कराड यांचे समर्थक जमा झालेले होते. त्यावेळी कराडांच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण झाली. त्यावेळी पोलिसांनी तातडीने पंकजा मुंडे यांच्या समर्थकाला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत (Legislative Council) डावलल्यामुळे आता भाजपमध्येच संघर्ष निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, उमेदवार जाहीर करताना त्यांचं नाव कुठेच नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचे समर्थक आता संतप्त झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्याचाच प्रत्यत आज औरंगाबादेत आला.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटतोय!

औरंगाबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याच्या तयारीत काही पंकजा मुंडे समर्थक आहेत, अशी चर्चा शहरात सुरु झाली. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पंकजा मुंडेंचे समर्थक कराडांच्या कार्यालयावर धडकले. त्यावेळी कराडांचे समर्थकही तयारीत होते. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. कराडांच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण केली. त्यावेळी पोलिसांनी मुंडेंच्या समर्थकाला ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये दुही माजत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हे सुद्धा वाचा

प्रवीण दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी पंकजा मुंडे समर्थकांकडून त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील धांडे नगर परिसरात प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान मुंडे समर्थकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यावेळी गाडी न रोखल्यानं पंकजा समर्थक थेट गाड्यासमोर आडवे झाले. त्यामुळे मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय.

पंकजा मुंडे कधी बोलणार?

विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा पंकजा मुंडे यांना होती. पक्षाकडून संधी मिळाल्यास संधीचं सोनं करणार, असंही त्या म्हणाल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा त्यांना संधी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. राज्यात विविध भागात मुंडे यांचे समर्थक रस्त्यावर उतरुन नाराजी व्यक्त करत आहेत. आता तर पक्षांतर्गत संघर्ष पेटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांनी समोर येत कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे. तसंच कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्याची गरज आहे. त्यामुळे पंकजा मुंडे कधी बोलणार? असा प्रश्न भाजपमध्ये हळू आवाजात विचारला जातोय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.