देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुनच राज्यात ड्रग्सचा खेळ सुरु असल्याचंही मलिक म्हणाले. मलिकांच्या या आरोपांवर आता भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, 'हे अत्यंत हास्यास्पद'
पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 12:21 PM

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. फडणवीस यांचे ड्रग्स पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुनच राज्यात ड्रग्सचा खेळ सुरु असल्याचंही मलिक म्हणाले. मलिकांच्या या आरोपांवर आता भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. (Pankaja Munde’s reply to the allegations made by Nawab Malik against Devendra Fadnavis)

एका माजी मुख्यमंत्र्यांवर हा आरोप केला जात आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एवढं चांगलं काम उभं केलं, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. पत्रकारांनी त्यांना अजून काही प्रश्न विचारले. मात्र, पंकजा मुंडे यांनी उत्तर देणं टाळलं.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत.

महाराष्ट्रात जेव्हा ते मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता.

त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहे.

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार – फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांच्या आरोपांचं खंडन केलं. मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोतील व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं. मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला, आता लक्षात ठेवावं आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेल. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांनी माझ्याशी बोलू नये. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. पण शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहे. दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली. त्याला अंतापर्यंत न्यावे लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

इतर बातम्या : 

अमृता फडणवीसांवर मलिकांचे आरोप, सोमय्या म्हणतात, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण फक्त ठाकरे-पवारच करू शकतात

नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

Pankaja Munde’s reply to the allegations made by Nawab Malik against Devendra Fadnavis

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.