सरपंच पद OBC महिलेला, पात्र उमेदवारच नाही, परभणीतल्या गावात राडा सुरुय, वाचला का?

आपल्या गावातल्या निवडणुकीत खोट्या पद्धतीने शिरकाव करणाऱ्या उमेदवाराविरोधात आता गावकरी एकवटले आहेत. संगीता पाथरकर यांचा उमेदवारी अर्जच रद्द करण्यासाठी अख्खा गाव एकत्र आलाय.

सरपंच पद OBC महिलेला, पात्र उमेदवारच नाही, परभणीतल्या गावात राडा सुरुय, वाचला का?
उमरथळी गावकरी उमेदवाराविरोधात एकवटलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 5:46 PM

परभणीः देश पातळीवरच्या निवडणुका जितक्या उत्कंठावर्धक असतात, तितक्याच रंगीत ग्रामपंचायत निवडणुकाही असतात. परभणीतल्या (Parbhani) गावाचंच उदाहरण घ्या. पालम तालुक्यातल्या उमरथळी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच (Sarpanch) पदाची चर्चा सुरु आहे. इथलं सरपंच पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित (Reservation) झालंय. मात्र गावात तर एकही ओबीसी महिला नाही, असं गावकरी सांगतायत. उमेदवार तर उभा राहिलाय. हा उमेदवार शेजारच्या गावातून आणला गेलाय आणि तोदेखील खोट्या कागदपत्रांवर. या उमेदवाराची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत. विशेष म्हणजे या महिलेचं दुसऱ्या गावाच्या मतदार यादीत नावही असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

काय आहे नेमका वाद?

परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातील उमरथळी गावाचा हा वाद आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी इथे ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी आहे. इथलं सरपंच पद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. मात्र गावात सर्व खुल्या प्रवर्गातील उमेदवार असूनही या तांत्रिक अडचणीचा फायदा घेण्याचं षड्यंत्र रचलं जातंय, असा आरोप गावकरी करतायत. कारण शेजारच्या घोडा गावातील संगीता पाथरकर यांनी बोगस भाडेपत्राच्या आधारे उमरथळी गावाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेतलंय व आता सरपंच पदाची निवडणूक लढवत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. संगीता पाथरकर यांचा नाव घोडा ग्रामपंचायत यादीत असल्याचे पुरावे गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेत.

ग्रामस्थांची मागणी काय?

माजी सरपंच नारायण सोपानराव दुधाटे म्हणतात, ओबीसी आरक्षण लाटण्यासाठी संगीता पाचरकर यांनी गावातल्या चार-पाच लोकांना हाताशी घेतलं. खोटे पुरावे करून यादीत नाव समाविष्ट केलं. आम्ही पुरावे जमवले आहेत. उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी प्रशासनाला विनंती आहे. गावातील अन्य एक नागरिक पंढरी दुधाटे म्हणतात, आरक्षण ढापण्यासाठी संगीता यांनी हा कट रचला असून आम्ही अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत.

गावकरी एकवटले, आंदोलनाच्या पवित्र्यात

आपल्या गावातल्या निवडणुकीत खोट्या पद्धतीने अशा रितीने शिरकाव करणाऱ्या उमेदवाराविरोधात आता गावकरी एकवटले आहेत. संगीता पाथरकर यांचा उमेदवारी अर्जच रद्द करण्यासाठी अख्खा गाव एकत्र आलाय. लवकरात लवकर ही कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही गावकऱ्यांनी दिलाय. तर संगीता पाथरकर यांच्या अशा हिंमतीमागे नेमका कुणाचा हात आहे, त्यांनाही दोषी धरावं, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.