पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली, चित्रा वाघ यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. लंके यांनी देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, ज्योती देवरे यांची बदली करण्यात आल्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
अहमदनगर : पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. लंके यांनी देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, ज्योती देवरे यांची बदली करण्यात आल्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. (Parner Tehsildar Jyoti Deore transferred to Jalgaon)
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आल्याचं समजतं. महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध आहे. हे सरकार लोकधार्जीणं नाही तर त्यांचे आमदार, मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहेत. ही बदली एका ज्योती देवरेची नाही तर 500 पेक्षा अधिक कार्यरत महिला तहसीलदारांचे मनोबल खच्चीकरण करण्याचं काम या सरकारनं केलं असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केलीय.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली करण्यात आल्याचे समजते
जाहिर निषेध आहे या महाविकास आघाडी सरकारचा
हे सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/z7wqocVJ5Y
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2021
“तहसिलदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं बचावासाठी प्रयत्न”
“तहसीदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून केविलवाणा प्रयत्न केला. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री-अपरात्री केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा प्रयत्न आहे,” असा आरोप आमदार निलेश लंके यांनी केला होता.
आत्महत्येचा कोणताही विचार डोक्यात नाही, तहसीलदार देवरेंचं लेखी आश्वासन
ज्योती देवरे यांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी मी आत्महत्या करणार नाही अशी लेखी हमी अहमदनगर पोलीस प्रशासनाला दिलीय. “पोलीस निरिक्षकांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली. तेव्हाही त्यांनी मी असं काहीही करणार नाही असं नमूद केलंय. आज (21 ऑगस्ट) पुन्हा आमच्या महिला डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांना पाठवण्यात आलं होतं. त्यांनी चर्चा केली. यात देवरे यांनी मी कार्यालयीन काम करतेय, मी असं काहीही करणार नसल्याचं सांगितलंय. कधीतरी विचारात असं बोललं गेलं होतं, पण आता असा कोणताही विचार माझ्या डोक्यात नाही, असं लेखी आश्वासन देवरे यांनी दिलंय,” असं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं होतं.
तहसीलदार देवरे यांचं असंही म्हणणं आहे की जिल्हा प्रशासन, पोलिसांनी योग्य ते सहकार्य केलंय आणि त्या याबाबत समाधानी असल्याचंही मनोज पाटील यांनी सांगितलं.
ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचा ठपका
तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केलाय. या अहवालात महिला तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
तहसीलदार देवरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक घोटाळे उघड झाल्याचं बोललं जातंय. देवरे यांनी अनेक कामांमध्ये हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. याशिवाय वाळू साठ्यातही गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे. जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणे, शरतील कोविड सेंटर, हॉस्पिटल विरोधात चौकशी करून कागदपत्रे सादर न करणे, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवणे आणि आपली कामाची जबाबदारी नीटपणे पार न पाडणे, कामात हयगय करणे आणि वरिष्ठांच्या आदेशाचा भंग करणे असे अनेक गंभीर आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर करण्यात आलेत.
इतर बातम्या :
अनिल देशमुखांच्या शोधासाठी ईडीने मागितली सीबीआयची मदत, तर भाजप नेत्यांचे राज्य सरकारला सवाल
Parner Tehsildar Jyoti Deore transferred to Jalgaon