Sushant Singh Case | सत्यमेव जयते ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयानेच सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला. यानंतर पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे (Parth Pawar on Sushant Singh Case).
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानेच सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला. यानंतर पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे (Parth Pawar on Sushant Singh Case). बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षांसोबतच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे पार्थ पवार यांना फटकारत त्यांच्या म्हणण्याला कवडीची किंमत नसल्याचं सांगितलं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. आता
सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं. यात त्यांनी “सत्यमेव जयते” इतकंच म्हटलं आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली मागणी योग्यच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी फटकारल्यानंतरही पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. त्यामुळे यावर शरद पवार आणि इतरांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
हेही वाचा : मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. तसेच आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.
हेही वाचा : आम्हाला शिवसेनेने दिलेला त्रास विसरणार नाही, आदित्यबाबत मनसेची भूमिका, नांदगावकर ट्रोल
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे.
संबंधित बातम्या :
रिया आदित्य ठाकरेंना कधीही भेटली नाही, वकील सतीश मानशिंदेंचा मोठा खुलासा
सुशांतचा भाऊ संजय राऊतांना भिडणार, मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा
संबंधित व्हिडीओ :
Parth Pawar on Sushant Singh Case