Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार यांचे ‘जय श्री राम!’, अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला पत्रातून शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Parth Pawar letter on Ram Mandir Ayodhya).

पार्थ पवार यांचे 'जय श्री राम!', अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला पत्रातून शुभेच्छा
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 9:26 AM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Parth Pawar letter on Ram Mandir Ayodhya). यात त्यांनी सुरुवातच ‘जय श्री राम!’ म्हणून केली आहे. “अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत,” असं मत व्यक्त केलं. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असं आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केलं.

पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. तसेच या मुद्द्यावर आपली भावना आणि भूमिका व्यक्त केली. विशेष म्हणजे मागील काही दिवसांमध्ये पार्थ पवार यांनी काही मुद्द्यांवर पक्षाच्या पलिकडे जाऊन भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं. महाविकासआघाडी सरकार वारंवार अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात राज्याकडे तपास राहावा असा आग्रह करत आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दुसरीकडे पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राम मंदिराच्या मुद्द्यावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यापेक्षा कोरोनाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं म्हणत त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचं सांगितलं होतं. आता पार्थ पवार यांनी राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरही ही भूमिका घेतली आहे.

पार्थ पवार या पत्रात म्हणाले, “काही सत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. या देशाच्या तरुण पिढीने राम जन्मभूमीच्या पवित्र भूमीवरुन सुरु झालेली शाब्दिक लढाई कायदेशीर आणि ऐतिहासिक पाहिली आहे. राम जन्मभूमीच्या या जुन्या प्रकरणावर लोकशाही व्यवस्थेअंतर्गत सामंजस्य आणि शांततामय मार्गाने तोडगा निघाला हेही आपण पाहिलं. यातून आपल्याला एक बोध घेता येईल. या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी काही संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने वागले पाहिजे.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपणे पराभूत झाले आहेतच. आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे असं ज्यांना वाटत आहे त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे,” असं पार्थ पवार यांनी सांगितलं.

आजच्या आधुनिक भारतात राम लल्ला यांना अयोध्येत त्यांच्या हक्काचे जे होते ते मिळाले. या क्षणी रामराज्याची आठवण आपल्याला होणे साहजिक आहे. रामराज्य ही संकल्पना बापूंना प्रिय होती. रामराज्यात रामाची पूजा होत असे. कारण रामराज्यात प्रत्येक प्राणिमात्राला, फक्त मनुष्यमात्र नव्हे, सन्मानाने आणि प्रतिष्ठेने वागवलं जात असे,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

देशभावना समजून घ्या, पार्थ पवारांची थेट गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मोठी मागणी

पुणे पदवीधर निवडणूक, पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

Parth Pawar letter on Ram Mandir Ayodhya

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.