PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला, 6 जागा राखण्याचं आव्हान

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला, 6 जागा राखण्याचं आव्हान
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 8:49 AM

पुणे : ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Pune District Central Co Operative Bank Election) निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 6 जागांसाठी मतदान सुरु आहे. पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या, यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत आहे. उर्वरित 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. 6 जागा ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी सुरु आहे.

कोणकोणत्या 6 जागांवर मतदान

अ वर्ग मुळशी आणि शिरुर तालुक्यातील दोन जागा

महिला सर्वसाधारण दोन जागा

क वर्ग आणि ड वर्ग प्रत्येकी 1 जागा

बारामती तालुक्यात 4 जागांसाठी होणार मतदान

सहाही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत

कोणाकोणाची बिनविरोध निवड

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne), इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

बँकेचे संचालक मंडळ : 21

– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13

– ब मतदार संघ : 1

– क मतदार संघ : 1

– ड मतदार संघ : 1

– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1

– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1

– विभक्त जाती व प्रजाती : 1

– महिला प्रतिनिधी : 2

संबंधित बातम्या :

PDCC Bank Election | दत्तामामांचे ‘हुश्श..’, पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्यमंत्री भरणेही बिनविरोध

Ajit Pawar | पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक, यंदा 30 जणांचं आव्हान

PDCC Bank Election | काँग्रेसचे दोन आमदार बिनविरोध, पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादा-भरणेंची प्रतिष्ठा पणाला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.