‘आम्ही पालघर साधू हत्याकांड विसरलेलो नाही; चित्रगुप्तानेही पाप-पुण्याचा हिशेब मांडताना महाविकास आघाडीला शाप दिले असतील’

भक्तांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यांनी महाविकासआघाडी सरकारला कदापी माफ करू नये. | Ram Kadam

'आम्ही पालघर साधू हत्याकांड विसरलेलो नाही; चित्रगुप्तानेही पाप-पुण्याचा हिशेब मांडताना महाविकास आघाडीला शाप दिले असतील'
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 12:24 PM

मुंबई: महाराष्ट्र सरकारने केवळ अहंकारापोटी इतके दिवस राज्यातील मंदिरे बंद ठेवली. नियम पाळून मंदिरे सुरु करायची होती तर ती आधीच का केली नाहीत? त्यामुळे जनतेने आज महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात लगावली आहे, अशी टीका भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी केली. तसेच आम्ही पालघर साधू हत्याकांड अजून विसरलेलो नाही. पालघर हत्याकांडाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे सोपवण्याची मागणी आता आम्ही उचलून धरणार आहोत. किमान आता तरी या अहंकारी सरकारला सद्बुद्धी यावी, असे वक्तव्य राम कदम यांनी केली. (BJP MLA Ram Kadam demands handover Palghar lynching case probe to CBI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे सोमवारपासून खुली झाली. यानिमित्ताने भाजपकडून राज्यभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनी सोमवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

यावेळी राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली आहे. अटी घालून मंदिरे उघडायची होती तर हे आधी करता आले नसते का? भक्तांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यांनी महाविकासआघाडी सरकारला कदापी माफ करू नये, असे राम कदम यांनी सांगितले.

तसेच भाजपला पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा विसर पडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, ही आमची मागणी आहे. आज चित्रगुप्त पाप-पुण्याचा हिशेब लिहत असले तर तोदेखील महाविकासआघाडी सरकारला यासाठी शाप देईल, अशी टीका राम कदम यांनी केली.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे राज्य सरकार मंदिरे उघडण्यास तयार नव्हते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुंबईसह राज्यभरात मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली होती. अखेर आजपासून मंदिरे खुली झाल्याने भाजपच्या नेत्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

संबंधित बातम्या:

‘हिंदू सणांवर बंदी हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोगाम असेल, पण ईश्वराने त्यांना सद्बुद्धी दिली’

‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिर संस्थानकडून मोबाईल अॅप तयार, ‘एक खिडकी योजने’चीही सोय

(BJP MLA Ram Kadam demands handover Palghar lynching case probe to CBI)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.