Sujay Vikhe Patil : आजी-माजी महसूल मंत्र्याचा फरक जनतेच्या लक्षात येईल, सुजय विखेंचा बाळासाहेब थोरात यांना टोला

माजी महसूल मंत्री यांनी सत्तेचा उपयोग जनतेच्या हितासाठी नव्हे तर नातेवाईकांना पोसण्यासाठी केला. एकवेळ तर त्यांच्या नातेवाईकाने थेट कार्यकर्त्याच्या डोक्यावर बंदुक ठेवली होती. मात्र, हा वाळूच्या पैशाचा माज हा आगामी दोन महिन्यात जिरवणार असल्याचेही विखे पाटलांनी सांगितले आहे. नगर जिल्ह्यात वाळू चोरी जिथे दिसेल त्यातून पोर्टल वर फोटो अपलोड करून त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल,वाळू तस्करी मुक्त जिल्हा या संकल्पनेतूनन काम होणार असल्याचे सुजय विखेंनी सांगितले आहे.

Sujay Vikhe Patil : आजी-माजी महसूल मंत्र्याचा फरक जनतेच्या लक्षात येईल, सुजय विखेंचा बाळासाहेब थोरात यांना टोला
खासदार डॉ.सुजय विखे पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:04 PM

अहमदनगर :  (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महसूल मंत्रीपद हे नगर जिल्ह्याकडेच राहिले आहे. (MVA) महाविकास आघाडी सरकारमध्ये याच जिल्ह्यातील (Balasaheb Thorat) बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते. मात्र, कोणी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले याचे मुल्यमापन आता जनताच करणार आहे. शिवाय अवैध वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने होत होता हे देखील समोर येईल, त्यामुळे अवघ्या काही काळातच जनतेला आजी-माजी महसूल मंत्र्यातील फरक लक्षात येईल असा टोला खा. सुजय विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे. एवढेच नाहीतर गेल्या अडीच जिल्ह्यातील विकास कामे ही प्रलंबित राहिली आहेत ती पूर्ण केली जाणार असल्याचे आश्वासनही सुजय विखे यांनी दिले आहे.

पाण्याचा संघर्षही मिटवणार

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे. मात्रस सत्तेत असतानाही जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर लोटांगण घेतले होते. त्यामुळेच हा महत्वाचा प्रश्न रखडलेला आहे. आता नगरकरांना हक्काचे पाणी मिळवून देण्यात येणार आहे. पाण्याविना नगरकरांचे मोठे हाल झाले आहेत. भविष्यात हा प्रश्न निकाली लावणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले आहे.

अर्थार्जनासाठी पदाचा उपयोग केला

माजी महसूल मंत्री यांनी सत्तेचा उपयोग जनतेच्या हितासाठी नव्हे तर नातेवाईकांना पोसण्यासाठी केला. एकवेळ तर त्यांच्या नातेवाईकाने थेट कार्यकर्त्याच्या डोक्यावर बंदुक ठेवली होती. मात्र, हा वाळूच्या पैशाचा माज हा आगामी दोन महिन्यात जिरवणार असल्याचेही विखे पाटलांनी सांगितले आहे. नगर जिल्ह्यात वाळू चोरी जिथे दिसेल त्यातून पोर्टल वर फोटो अपलोड करून त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल,वाळू तस्करी मुक्त जिल्हा या संकल्पनेतूनन काम होणार असल्याचे सुजय विखेंनी सांगितले आहे. सर्व तहसीलदारांवर कारवाई केली जाईल तर पुढच्या दोन वर्षात कुपनासाठी कधी कोणाला पैसे द्यावे लागणार नाही असेही विखे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस देतील तो उमेदवार निवडुण आणू

आरपीआयचे रामदास आठवले यांनी शिर्डी मतदार संघातून लोकसभान निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिर्डी मतदार संघातून रामदास आठवले यांना उमेदवारी दिली तर काय असा सवाल उपस्थित करताच सुजय विखे यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस जे उमेदवार देतील त्याच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे मंत्रीपद मिळताच नगरचे राजकारण तापू लागले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.