Aditya Thackeray : सध्याचे सरकार बेकायदेशीर अन् गद्दारही, आदित्य ठाकरे यांनी सांगितली सरकारची ‘डेडलाईन’
गद्दारी आणि धोका देणे हे महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारी गोष्ट आहे. स्वत:ला शिवसैनिक म्हणणाऱ्यांनी हे कृत्य केले असून अशा प्रकारच्या गद्दारीला महाराष्ट्रातील जनता ही खपवून घेणार नाही. शिवसैनिक आणि जनताच यांना त्यांची जागा दाखवून देतील. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यातही राहील. दोन गद्दार निघाले तरी शिवसैनिक कायम ठाकरे कुटुंबियांसोबत आहे. त्यांनी केलेले कृत्य हे जनतेला पटलेले नाही.
सिंधुदुर्ग : एकीकडे (Eknath Shinde) शिंदे गटातील आमदार हे आम्हाला गद्दार म्हणू नकात असे सांगत आहेत. तर दुसरीकडे (Shiv Sena) शिवसेनेकडून त्यांचा उल्लेख गद्दार असाच केला जात आहे. हे कमी म्हणून की काय आता आदित्य ठाकरे यांनी गद्दार बरोबर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर खुपसणारे असाच त्यांचा उल्लेख केला आहे. (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांची सध्या निष्ठा यात्रा सुरु असून त्यांनी हा घणाघात सिंधुदुर्गात केला आहे. शिवाय या कोकणातल्याही दोन आमदारांचाही गद्दारांमध्ये समावेश असल्याचे म्हणत त्यांनी उदय सामंत आणि दिपक केसरकर यांच्यावरही जहरी टिका केली आहे. एवढेच नाहीतर हे बेकायदेशीर सरकार केवळ महिन्याभरासाठी असणार आहे. कोणत्याही नियमाचे पालन न करता हे सत्तेवर रुढ झाले आहेत पण अधिकच्या काळासाठी नाही. महिन्याभरात त्यांना पायउतार व्हावे लागणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले आहे.
गद्दारी महाराष्ट्र खपवून घेणार नाही
गद्दारी आणि धोका देणे हे महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारी गोष्ट आहे. स्वत:ला शिवसैनिक म्हणणाऱ्यांनी हे कृत्य केले असून अशा प्रकारच्या गद्दारीला महाराष्ट्रातील जनता ही खपवून घेणार नाही. शिवसैनिक आणि जनताच यांना त्यांची जागा दाखवून देतील. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यातही राहील. दोन गद्दार निघाले तरी शिवसैनिक कायम ठाकरे कुटुंबियांसोबत आहे. त्यांनी केलेले कृत्य हे जनतेला पटलेले नाही. केवळ शिवसेना आणि शिवसैनिकांचा आव आणण्यासाठी त्यांचा दौरा आहे. भविष्यात केलेल्या कृत्याची परतफेड करावी लागणार हे निश्चित असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
राजीनामे द्या अन् निवडूण दाखवा
केवळ शिवसेनेतून उमेदवारी आणि बाणामुळेच यांना जनतेने स्विकारले होते. पण त्यांनी ही भूमिका घेऊन पक्षाशी तर गद्दारी केलीच पण जनतेचाही विश्वास गमावला आहे. ठाकरे कुटुंब नको तर आमदाराकीचा राजीनामा देऊन निवडणुक लढा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गमध्ये दिला आहे.
गद्दारबरोबर विश्वासघातकीही, केसरकरांना उत्तर
शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांचा उल्लेख आता गद्दार म्हणूनच केला जात आहे. पण ही गद्दारी नाही आम्ही उठाव केल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. असे असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आम्हाला गद्दार म्हणू नका अन्यथा आम्हीही कोणतीही सीमा बाळगणार नसल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांना सुनावले होते. मात्र, निष्ठा यात्रेच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी कोकणातच ते गद्दार तर आहेतच पण विश्वासघातकीही असे म्हणत केसरकरांना उत्तर दिले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे आता दोन आमदरांच्या बंडानंतर काय होणार हे पहावे लागणार आहे.