PMC election 2022, Ward 8 : पीएमसी प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रवादीचा पत्ता कट; भाजपाचा विजय निश्चित
प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपचे तीन नगरवेक आणि राष्ट्रवादीचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. प्रभाग क्र. आठ अ मध्ये भाजपतर्फे सीमा साळवे या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र. 8 ब मध्ये भाजपच्या नम्रता लोंढे तर प्रभाग क्र. 8 क मध्ये भाजचे विलास मडेगिरि विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. 8 ड मध्ये मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रांत लांडे यांनी विजय संपादीत केला होता.
पिंपरी चिंचवड: प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणकीची तयारी सुरु केली. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील(PCMC Election 2022) प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे तीन नगरसेवक तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार आहे. प्रभाग क्र. 8 मधील अ, ब, क या तीन प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग 8 ड मध्ये राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र, 2022 च्या प्रभाग रचनेतील बदलानुसार प्रभाग क्र. 8 ड हा प्रभागच रद्द झाला आहे. यामुळे आता प्रभाग क्र. 8 मध्ये अ, ब, क असे तीन प्रभाग असणार आहेत. यामुळे प्रभाग क्र 8 ड मधून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पत्त कट झाला आहे.
प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपचे तीन नगरवेक आणि राष्ट्रवादीचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. प्रभाग क्र. आठ अ मध्ये भाजपतर्फे सीमा साळवे या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र. 8 ब मध्ये भाजपच्या नम्रता लोंढे तर प्रभाग क्र. 8 क मध्ये भाजचे विलास मडेगिरि विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. 8 ड मध्ये मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रांत लांडे यांनी विजय संपादीत केला होता.
प्रभाग क्र. 8 अ मध्ये सात उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणात
प्रभाग क्र. 8 अ मध्ये तब्बल सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. (डोळस) गायकवाड केशर प्रदिप यांनी अपक्ष उमेद्वार म्हणून तर सरिता सत्यवान कांबळे यांनी भारीप बहुतर्फे निवडणुक लढवली. चांदणी धम्मदीप लगाडे या BSP च्या उमेदवार होत्या. कोमल अजय साळुंखे (ढोबळे) शिवसेना, सावळे सिमा रविंद्र BJP, शिंदे सावित्री बन्सी काँग्रेस तर झोबाडे सविता संदीपान यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या पैकी . प्रभाग क्र. आठ अ मध्ये भाजपच्या सीमा साळवे विजयी झाल्या.
प्रभाग क्र. 8 ब मध्ये भाजपचे विलास मडेगिरि विजयी
प्रभाग क्र. 8 ब मध्ये शिवसेनेच्या पूजा लांडगे, भाजपच्या नम्रता लोंढे आणि राष्ट्रवादीच्या सोनाली उदावंत यांच्यात तिहेरी लढत झाली. यात भाजपच्या नम्रता लोंढे विजयी झाल्या.
प्रभाग क्र. 8 क मध्ये बहुरंगी लढत
प्रभाग क्र. 8 अ प्रमाणेच प्रभाग क्र. 8 क मध्ये देखील तब्बल सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गंगणे दशरथ पाराजी आणि सस्ते राहुल तुकाराम यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली. भाजप तर्फे विलास मडेगिरि, शिवसेनेतर्फे मुटके निलेश रामदास, बहुजन रि. तर्फे सरवदे महेंद्र लक्ष्मण, राष्ट्रवादी तर्फे वाबळे संजय मल्हारराव तर BSP तर्फे जावेदभाई रशिद शहा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या बहुरंगी लढतीमध्ये भाजचे विलास मडेगिरि विजयी झाले.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर, अपक्ष |
प्रभाग क्र. 8 ड मध्ये पंचरंगी लढतीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी
प्रभाग क्र. 8 अ आणि प्रभाग क्र. 8 क प्रमाणेच प्रभाग क्र. 8 ड पंचरंगी लढत पहायला मिळाली एका जागेसाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजप तर्फे कामतेकर सारंग अविनाश, काँग्रेसतर्फे अझर सिकंदर खान, राष्ट्रवादी तर्फे लांडे विक्रांत विलास, शिवसनेतर्फे तुषार भिवाजी सहाणे तर अपक्ष म्हणून लांडगे सुदाम हिरामण यांनी निवडणुक लढवली. पंचरंगी लढतीत राष्ट्रवादीचा उमेदवार विक्रांत लांडे विजयी झाले.
प्रभाग 8 मध्ये भाजपचे नगरसेवक सेफ झोनमध्ये
यापैकी प्रभाग 8 अ हा ओबीसी महिला, प्रभाग 8 ब – खुला महिला तर प्रभाग 8 क – खुला अशा प्रकारे आरक्षित झाला आहे. प्रभाग 8 अ मध्ये भाजपला ओबीसी उमेदवार द्यावा लागणार आहे. तर प्रभाग 8 ब – खुला महिला गट म्हणून आरक्षित झाल्याने यथे नम्रता लोंढे यांना संधी मिळणार आहे. तर प्रभाग 8 क हा खुला गट असल्यामुळे भाजपचे विलास मडेगिरि यांना तिकीट मिळण्याची संधी आहे. यामुळे भाजपचे तीनही नगरसेलक सेफ झोनमध्ये आले आहेत. तर प्रभाग क्र. 8 ड हा प्रभागच रद्द झाल्याने प्रभाग रचनेतील बदलाचा मोठा फटका येथून विजयी झालेलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांना बसला आहे.
प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक जागा ओबीसी महिला गटासाठी राखीव
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने 2022 च्या निवडणूक आरक्षणाची नव्यानं सोडत जाहीर झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवडमधील 139 पैकी 37 जागा या ओबीसींना आरक्षित करण्यात आल्या आहेत. सोडतीनंतर अनेक विद्यमान नगरसेवकांना याचा फटका बसलाय. प्रभाग क्रमांक 8 अ हा ओबीसी महिला गट म्हणून राखीव करण्यात आला आहे.
असं आहे ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांचे आरक्षण
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेत 37 पैकी 19 महिला ओबीसी असणार आहेत. सर्व साधारण खुल्या गटात 77 पैकी 38 महिलांना संधी दिली जाणार आहे. अनुसूचित जाती – 22 पैकी 1 महिला तर अनुसूचित जमाती – 3 पैकी 2 महिला असणार आहेत. एकूण – 139 पैकी 70 महिला उमेद्वारांना संधी दिली जाणार आहे.
प्रभाग रचनेतील बदलामुळे राष्ट्रवादीच्या उमेद्वाराचा पत्त कट
सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत प्रभाग निहाय बदल करण्यात आले आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक आठ मधून एका नगरसेवकाची संख्या कमी झाली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये आता प्रभाग क्रमांक 8 अ, प्रभाग क्रमांक 8 ब आणि प्रभाग क्रमांक 8 क अशा तीन नगरसेवकांना संधी मिळणार आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 8 अ हा ओबीसी महिला गट म्हणून आरक्षित करण्यात आला आहे. तर आणि प्रभाग क्रमांक 8 ब हा सर्वसाधारण महिला गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 8 क हा सर्वसाधारण गटासाठी खुला असणार आहे. प्रभाग क्र. 8 ड हा रद्द झाला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराचा पत्ता कट झाला आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
प्रभाग क्रमांक आठ अ मधून सीमा साळवे विजयी झाल्या होते. हा गट ओबीसी महिला गट म्हणून आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये नम्रता लोंढे या सध्या नगरसेविक आहेत. आता प्रभाग क्रमांक 8 ब हा सर्वसाधारण महिला गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. यामुळे नम्रता लोंढे यांना पुन्हा निवडणुक लढण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक आठ क हा सर्वसाधारण खुला गट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे भाजपचे विलास मडेगिरि यांना पुन्हा पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभाग रचनेतील बदलानुसार प्रभाग क्र. 8 ड हा प्रभागच रद्द झाला आहे. या प्रभागात राष्ट्रवादीचे विक्रांत लांडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. मात्र, प्रभागाच रद्द झाल्याने त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षांवर पाणी फिरले आहे.
मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?
जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केंद्रिय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडे वस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर, टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्यमनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर आदी परिसर येतात.
लोकसंख्या आणि मतदार
या प्रभागात एकूण 59, 390, मतदार आहेत. यापैकी 8,898 हे अनुसूचित जातीचे तर 610 मतदार अनुसूचित जमातीचे आहेत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर, अपक्ष |