तयारीला लागा, लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सूत्र
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात अपेक्षित आहेत. मात्र, या निवडणुकांसोबतच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता बळावली आहे. कारण या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड […]
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात अपेक्षित आहेत. मात्र, या निवडणुकांसोबतच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता बळावली आहे. कारण या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या दरम्यान संपणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन-तीन महिन्यात या निवडणुका अपेक्षित असतात. मात्र, आता या तिन्ही राज्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्यास, तिन्ही राज्यात मे महिन्यातच निवडणुका होतील. यात महाराष्ट्राचाही समावेश असल्याने राज्यातील राजकीय वर्तुळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यात आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही राज्यातील आपल्या मुख्यमंत्र्यांना कळवंलय की, नेत्यांसह तुम्ही निवडणुकीसाठी तयार राहा. स्वत: पंतप्रधानांनी तयारीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत व्हाव्यात, असा मानस स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोगाकडे बोलून दाखवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र :
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि इतर मित्रपक्षांचं सरकार आहे. या मध्ये भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने, राज्य सरकारमध्ये अर्थात भाजपचं वर्चस्व आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रीही भाजपचाच आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 निकाल
- भाजप- 122
- शिवसेना- 63
- काँग्रेस- 42
- राष्ट्रवादी- 41
- बहुजन विकास आघाडी- 3
- शेतकरी कामगार पक्ष- 3
- एमआयएम- 2
- भारिप बहुजन महासंघ- 1
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी- 1
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- 1
- समाजवादी पार्टी- 1
- अपक्ष- 7
हरियाणा :
हरियाणा विधानसभा 90 जागांची असून, सध्या इथेही भाजपचं सरकार आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत हरियाणात 90 पैकी 47 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे हे राज्य टिकवणं हे भाजपसमोरील आव्हान असणार आहे.
झारखंड :
झारखंडमध्येही भाजपचा मुख्यमंत्री असून, विधानसभेच्या एकूण 47 जागांपैकी 43 जागा एकट्या भाजपच्या आहेत. त्यामुळे हेही राज्य भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.